आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Expresses Concern Over ASEAN's South China Sea Stance

चीनच्या पाणबुडीमुळे चिंता; सागरी चाचांविरोधी कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - सागरी चाचांविरोधातील कारवाईचा भाग म्हणून चीनने एडनच्या आखातात अण्वस्त्रवाहू पाणबुडी तैनात केली आहे. चीनच्या या कृतीमुळे भारतासह शेजारी देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते, असा संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नौदलाकडून एडनच्या आखातात अण्वस्त्रवाहू पाणबुडी तैनात केल्याची माहिती चीनच्या अधिकृत प्रसारमाध्यमांतर्फे सांगण्यात आली. ०९१ टाइप पाणबुडी असल्याचे सांगण्यात येते. या मोहिमेत चालक दल सदस्यांना अनेक अडथळे पार करावे लागतील, असे पाणबुडीचे डेप्युटी कमांडर यू झेनगिआंग यांनी सीसीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. सुरुवातीस एडन आखातामध्ये अत्यावश्यक साधनांची पूर्तता आणि अनोळखी सागरी क्षेत्रात काम करणे आव्हानात्मक असल्याचे यू यांच्या हवाल्याने हाँगकाँगस्थित साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र, चीनची पाणबुडी तैनाती शेजारी देशांसाठी चिंतेचे कारण ठरू शकते, असा संरक्षण क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे. चीन राजकीय हितसंबंधासाठी पुढील काळात आणखी युद्धनौका तैनात करेल. या तैनातीबद्दल भारतासह अमेरिकेलाही चिंता सतावू शकते, असे तैपेईतील सोसायटी ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज सरचिटणीस हसिह तै-हसी यांनी सांगितले.