आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलियन शोधणारे टेलिस्कोप चीनमध्‍ये तयार: 30 फुटबॉल मैदानाएवढा आकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्‍ये जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप लावण्‍याचे काम पूर्ण झाले आहे. 12 अब्‍ज रुपये खर्च करून हे काम करण्‍यात आले असून या टेलिस्कोपमध्‍ये 4,500 पॅनल लावलेले आहेत. याव्‍दारे एलियंसच्‍या अस्‍तित्‍वाची माहिती मिळणार आहे. 500 मीटर रुंद असलेल्‍या ऐपर्चर स्फेरिकल टेलिस्कोपचे (FAST) शेवटचे पॅनल नुकतेच फिट करण्‍यात आले आहे. चायनाचे स्टेट ब्रॉडकास्टर सीसीटीव्‍हीच्‍या माध्‍यमातून सप्‍टेंबरमध्‍ये हे ऑपरेशन करतील अशी शक्‍यता आहे. 1.6 किलोमीटर आहे डायमीटर...
- टेलिस्कोप साउथ-वेस्ट चायनाच्‍या गुईझोऊ प्रॉविन्समध्‍ये लावण्‍यात आले आहे.
- या टेलिस्‍कोपचा आकार हा 30 फुटबॉलच्‍या मैदानांएवढा आहे.
- हे टेलिस्‍कोप चालू झाल्‍यानंतर त्‍याव्‍दारे अंतराळातील 1,000 लाइट ईयर्स दूरील ता-यांबाबत माहिती मिळू शकेल.
- हा प्रकल्‍प मार्च 2011 मध्‍ये सुरू झाला होता. वेळेच्‍या आधीच हा प्रकल्‍प पूर्ण करण्‍यात आला.
आता यूएसमध्‍ये आहे सर्वात मोठे टेलिस्‍कोप..
- आतापर्यंत नॉर्थ अमेरिकेच्‍या पोर्टो रीको येथील एरेसिबो ऑब्जर्वेट्री हा सर्वात मोठा टेलिस्कोप होता.
- चीनी वैज्ञानिकांच्‍या मतानुसार, नवीन टेलिस्कोपव्‍दारे स्पेसच्‍या आणखी जवळ जाऊन अभ्‍यास करण्‍याची क्षमता वाढणार आहे.
- एका दाव्‍यानुसार हे टेलिस्कोप स्पेसमधील कमजोर रेडियो सिग्नल्सही सहजपणे रिसीव्‍ह करू शकेल.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, असा दिसतो हा टेलिस्‍कोप..
बातम्या आणखी आहेत...