Home | International | China | China First Time Said Dokalam Standoff Safely Resolved After Talks

डोकलाम वादावर चर्चेतूनच तोडगा निघाला, अखेर चीनच्या लष्करी अधिकाऱ्याची कबुली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 23, 2017, 10:44 AM IST

डोकलाम वाद मिटल्यानंतरही उलट-सुलट प्रतिक्रिया देणाऱ्या चीनने अखेर हा वाद मिटल्याची कबुली दिली

 • China First Time Said Dokalam Standoff Safely Resolved After Talks
  बीजिंग - डोकलाम वाद मिटल्यानंतरही उलट-सुलट प्रतिक्रिया देणाऱ्या चीनने अखेर हा वाद मिटल्याची कबुली दिली आहे. चीनच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, सिक्किमच्या डोकलाम परिसरात 73 दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर तोडगा निघाला आहे. हा तोडगा कित्येक चर्चा आणि बैठका झाल्यानंतर काढण्यात आला असेही संबंधित अधिकाऱ्याने मान्य केले आहे.

  >> वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (PLA) अधिकारी लिऊ फांग यांनी सत्ताधारी काँग्रेसच्या चालू काँग्रेसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रविवारी ही कबुली दिली.
  >> डोकलाम वादावर तोडगा निघणे याचे जिवंत उदाहरण आहे, की चिनी लष्कर कशाप्रकारे इतर देशांशी शांतता चर्चा करून मुद्द्यांवर तोडगा काढतो. डोकलामवर आम्ही व्यावहारिक सहकार्य दाखवले असेही ते पुढे म्हणाले.
  >> उल्लेखनीय बाब म्हणजे, डोकलाम परिसराचा वाद 16 जूनपासून सुरू झाला. कित्येक दिवस दोन्ही देशांमध्ये कळीचा मुद्दा राहिलेल्या या वादात दोन्ही देशांचे सैनिक समोरा-समोर आले होते. 28 ऑगस्ट रोजी भारत-चीनने आप-आपले सैनिक माघारी घेण्यासाठी सहमती दर्शवली होती.
  >> भारताने त्याचवेळी हा वाद निवळल्याचे जाहीर केले होते. मात्र, चीनने आपल्या माध्यमांवरून आणि अधिकाऱ्यांमार्फत हा वाद अजुनही सुरू असल्याचा प्रचार केला. अखेर चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने हा वाद विशेष म्हणजे, शांततापूर्वक चर्चेतून निवडला याची कबुली दिली आहे.

 • China First Time Said Dokalam Standoff Safely Resolved After Talks
 • China First Time Said Dokalam Standoff Safely Resolved After Talks

Trending