इंटरनॅशनल डेस्क - चीनच्या तैहांग पर्वतांमधून गुओलियांग बोगदा खोदण्यात आला आहे. हा बोगदा जगातील सर्वात धोकादायक बोगद्यांपैकी एक आहे. चाळीस वर्षांपूर्वी येथे जगण फार अवघड होते. या बोगद्याचे बांधकाम 1972 मध्ये करण्यात आले होते. फक्त पायी चालण्याची सोय...
- या रस्त्यावरुन फक्त पायी चालता येऊ शकत होते. या रस्त्याने हुइक्सियान, झिनझियांग, हेनान प्रांतातील गावे जोडले होते.
- येथे प्रवास करणे खुप अवघड होते. जवळपास 720 पर्वतांवर बनवलेल्या
रस्ते ओलांडावे लागत होते.
- रस्त्याच्या मधेमधे बनवलेल्या शिड्या खूप धोकादायक होत्या. त्या खूप खडकाळ, चिंचोळा आणि बिना रेलिंगचा होत्या.
- या अडचणी पाहता गावच्या लोकांनी पर्वतांमधून बोगदा खोदण्याचा निर्णय घेतला.
- गावाचे प्रमुख शेन मिंगजिंगने आपल्या बक-या व औषधे विकून हातोडा व इतर अवजरेे खरेदी केले.
- 13 लोकांनी या प्रकल्पावर काम करायला सुरुवात केले आणि 1 हजार 200 मीटर लांब बोगदा खोदण्यासाठी 5 वर्षेे लागले.
मोठ्या संख्येने पोहोचतात पर्यटक
- हा बोगदा पाच मीटर उंच व चार मीटर रुंद होता. हा चीनमधील पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र आहे.
- या बोगद्याच्या खोद कामासाठी 12 टन ड्रिल रॉड आणि 4 हजार हतोड्यांचा वापर करण्यात आले होते.
- 1 मे 1977 मध्ये हा बोगदा खुला झाला. बोगद्याच्या भिंतीमध्ये 30 वेगवेगळ्या आकाराच्या खिडक्या आहेत.
- हे जगातील दहा मोठ्या रस्त्यांपैकी एक आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, चीनच्या या धोकादायक बोगद्याचे छायाचित्रे...