चीनमधील हायस्पीड रेल्वे नेटवर्क जगात सर्वात मोठे आहे. चीनमध्ये 19 हजार किलोमीटरचा लांब ट्रॅक आहे. 2020 पर्यंत तो 30 हजार किलोमीटर करण्याची योजना आहे. या नेटवर्कची सुरुवात 2007 मध्ये झाली होती. तेव्हा एका दिवसाला अडीच लाख लोक प्रवास करत होते. 2014 मध्ये ही संख्या 25 लाखांवर पोहोचली होती. (आजची आकडेवारी उपलब्ध नाही.) तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की, या ट्रॅकवरून जगातील दुसरी सर्वात वेगवान रेल्वे शंघाई मॅग्लेव धावते.
चला तर मग चीनच्या हायस्पीड ट्रेनविषयी जाणून घेऊ या रोचक फॅक्ट्स...- हार्बिन-वुहान हा चीनमधील सर्वात लांब हायस्पीड रेल्वे ट्रॅक आहे. 2446 किलोमीटर य ट्रॅकची लांबी आहे. हायस्पीट ट्रेनला हे अंतर कापण्यासाठी 14 तास 38 मिनिटांचा कालावधी लागतो.
- शेओगुआन ते लिएंग हे 248 किलोमीटरचे अंतर ताशी 316.6 किमी वेगात हायस्पीड ट्रेन फक्त 47 मिनिटात कापते.
- लेंझाउ-शिनझियांग ट्रॅक क्विलिअन माउंटेनवर जगातील सर्वात उंच बोगदा आहे. याची उंची 4345 मीटर असून लांबी 9.49 किलोमीटर आहे.
- ईस्टर्न शेंडोंग प्रॉविन्समध्ये चेंगलहून वेफेंगला (24 किलोमीटर) जाण्यासाठी इकोनॉमी क्लासचे तिकीट 46 रुपये आहे. चीनमध्ये हायस्पीड ट्रेनचे हे सर्वात कमी भाडे आहे.
- बिजिंग-शंघाई हा हायस्पीड ट्रेन मार्ग सर्वात महागडा आहे.
- 30 जून 2015 पर्यंत 330 मिलियन प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला आहे.
शंघाई मॅग्लेव
- जगातील दुसरी सर्वात हायस्पीड ट्रेन शंघाई मॅग्लेव
- ही ट्रेन शंघाई मॅग्लेव ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंट को-ऑपरेशन (एसएमटीडीसी) चालवते.
- सीमेन्स व थायसेनक्रूपने 2003 मध्ये ही ट्रेन सुरु केली होती.
- शंघाई ते पुडोंग इंटरनॅशनल एअरपोर्टचे 30 किलोमीटरचे अंतर ही ट्रेन फक्त आठ मिनिटात कापते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, चीनमधील हायस्पीड ट्रेनचे PHOTOS...