आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्कल करण्‍यात चीन सर्वात पुढे, या ब्रँड्सची बनतात डुप्लीकेट्स वस्तू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील टॉप क्रीडा साहित्य बनवणारी प्यूमा कंपनीचा चीनमधील अवतार. - Divya Marathi
जगातील टॉप क्रीडा साहित्य बनवणारी प्यूमा कंपनीचा चीनमधील अवतार.
नवी दिल्ली/बीजिंग - तुम्ही जर मोठ्या ब्रँडचे उत्पादन खरेदी करत असाल तर सावधान रहा. उत्पादन बनावटी असू शकते. तसे पाहिले तर हँडबॅग आणि परफ्यूमपासून ब्रँडेड स्ट्रॉबेरी ते केळीपर्यंत बनावटी निघू शकते. पण सर्वात जास्त बनावटी चप्पला तयार होतात. त्यानंतर कपडे, कातडी वस्तू आणि गॅजेट्स. जाणून घ्‍या कुठे तयार होत आहेत बनावटी उत्पादन...
- मोठ्या ब्रँड्सची नक्कल सर्वात जास्त चीनमध्‍ये होते. ओईसीडीच्या एका अहवालानुसार, 63.2 टक्के बनावटी वस्तू बनवल्या जातात.
- याबाबत भारत 1.2 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे. 2013मध्‍ये सर्व देशांमध्‍ये बनावटी वस्तूंची आयात करण्‍यात आली.
- हे एकूण जागतिक आयातीतील 2.5 टक्के आहे. 2013 मध्‍ये जगात एकूण 17.9 लाख कोटी डॉलरची आयात झाली होती.
- अभ्‍यासात ऑनलाइन पायरसीचा समावेश केला गेलेला नाही. ओईसीडीने 2008 च्या अहवालात म्हटले होते, की वैश्विक आयातीत बनावटी उत्पादनाचा हिस्सा 1.9 टक्के आहे.
- 2011-13 च्या कालखंडात वेगवेगळ्या देशाच्या कस्टम विभागाने बनावटी उत्पादनाचे पाच लाख प्रकरणे उघडकीस आणले होते.

सर्वाधिक चप्पल आणि कपड्यांची नक्कल
- सर्वाधिक नक्कल अमेरिका, इटली आणि फ्रान्सच्या ब्रँड्सची होते.
- युरोपियन युनियनमध्‍ये 5 टक्के आयात वस्तूंमध्‍ये नकली माल असतो.
- सर्वाधिक 62 टक्के नकली वस्तू पोस्टाच्या पार्सलमधून मिळतात.
- 2008 मध्‍ये 1.9 टक्के आयात उत्पादनात नकली होते, 2013 मध्‍ये 2.5 टक्क्यावर पोहोचले.
नक्कल उत्पादनामुळे किती नुकसान होते
नकली ऑटो पार्ट्स लवकर खराब होऊ शकतात. बनावटी औषधांमुळे लोक जास्त आजारी पडतात. नकली खेळण्‍यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तपासणी यंत्र चुकीची माहिती देऊ शकते.
नकली वस्तू बनवण्‍यात भारत पाचव्या क्रमांकावर
चीन 63.2%
तुर्कस्तान 3.3%
सिंगापुर 1.9%
थायलँड 1.6%
भारत 1.2%
मोरोक्को 0.6%
यूएई 0.5%
पाकिस्तान 0.4%
इजिप्त 0.4%

सर्वाधिक नकल येथील कंपन्यांच्या उत्पादनाची

अमेरिका 20%
इटली 15%
फ्रांस 12%
स्वित्झलंड 12%
जापान 8%
जर्मनी 8%
इंग्लैंड 4%
स्पेन 2%
बेल्जियम 2%
पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणकोणत्या ब्रँड्सची चीन करत आहे नक्कल...