आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे शेंझू-11 स्पेस एयरक्रॉफ्ट लाँच, 2 अॅस्ट्रोनॉट स्पेस लॅबमध्ये 30 दिवस राहणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिंग हे पेंग (50), चेन डाँग (37) हे दोघे अंतराळवीर या मोहिमेतंर्गत 30 दिवस अवकाशात राहतील. - Divya Marathi
जिंग हे पेंग (50), चेन डाँग (37) हे दोघे अंतराळवीर या मोहिमेतंर्गत 30 दिवस अवकाशात राहतील.
बीजिंग- चीनने सोमवारी शेंझू-11 स्पेस एयरक्रॉफ्ट लाँच केले. यात दोन अॅस्ट्रोनेॉट असतील जे अंतराळातील लॅंब स्पेसमध्ये 30 दिवस राहतील व तेथील निरीक्षण नोंदवतील. चीनची आतापर्यंतची ही सर्वात मोठी मानवी अंतराळ मोहिम आहे. ही मोहीम दीर्घकाळाची आहे. 2022 पर्यंत चीनच्या मालकीची कायमस्वरूपी अवकाश स्थानक स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाचे योगदान देणार आहे. आता अवकाशात त्यांची टेम्पररी लॅब थियानगोंग-2 पृथ्वीला फे-या घालत आहे. चीनची मानवी अंतराळ मोहिम 2003 साली सुरु झाली होती. परदेशी मिडिया होता उपस्थित....
- शेंझू-11 या अंतराळ यान अवकाशात सोडताना अनेक विदेशी शास्त्रज्ञ तसेच मिडिया उपस्थित होता.
- चीन सामान्यपणे परदेशी मिडियाला कव्हरेज करण्यास परवानगी देत नाही. - चीनचा उत्तरी भागातील गॉबी प्रदेशातील केंद्रावरून हे यान झेपावले.
- मोहिमेत जिंग हे पेंग (50), चेन डाँग (37) हे दोघे अंतराळवीर या मोहिमेतंर्गत 30 दिवस अवकाशात राहतील.
- चीनने यावर्षी तिस-यांदा आपली अंतराळ मोहिम राबवली आहे.
- या अगोदर चीनने 2003 मध्ये पहिली मानवी मोहीम आखली होती.
- त्यावर अब्जावधी डॉलर्सचा खर्च झाला होता.
2025 पर्यंत चंद्रावर माणूस पाठवायचा आहे चीनला-
- चीनने आपल्या स्पेस मिशनवर मागील 10 वर्षात अब्जावधी डॉलर खर्च केले आहेत.
- चीन अमेरिका, रशिया, भारत आणि जपानची बरोबरी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
- चीन 2025 पर्यंत चंद्रावर माणूस पाठवायचा आहे. सोबतच मंगळावर अमानवी व्हेईकल पाठवायचे आहे.
पुढे आणखी वाचा, या संबंधित माहिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...