चीनने 2 दिशादर्शक उपग्रहांचे केले प्रक्षेपण; 2020 पर्यंत चीन निर्मित जीपीएस प्रणाली कार्यान्वित
वृत्तसंस्था | Update - Nov 07, 2017, 07:10 AM IST
चीनने आपल्या दोन दिशादर्शक (नेव्हिगेशन) उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीला सक्षम पर्याय उभ
-
बीजिंग- चीनने आपल्या दोन दिशादर्शक (नेव्हिगेशन) उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीला सक्षम पर्याय उभा करण्याचे काम सध्या चीनमध्ये प्राधान्याने सुरू आहेत. ग्लोबल पोझिशनिंग नेटवर्कला चीन निर्मित पर्याय उभा करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या दोन उपग्रहांसह ३० छोट्या उपग्रहांचा समूह प्रक्षेपित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. द बायडू-३ असे नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाचे नाव आहे. रविवारी रात्री उशिरा मार्च- थ्री बी कॅरिअर रॉकेटद्वारे यांचे प्रक्षेपण झाले. शिचांग सॅटेलाइट लाँच सेंटरहून यांचे प्रक्षेपण झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. सिच्युआन प्रांतात हे केंद्र आहे.
चीनच्या बायडू नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम मोहिमेचा हा तिसरा टप्पा असल्याचे चीनच्या अवकाश संशोधकांनी म्हटले आहे. चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पातील देशांना याद्वारे सेवा पुरवली जाईल. चीनची विश्वव्यापी उपग्रह यंत्रणा वर्ष २०२० पर्यंत कार्यान्वित होणार आहे. या मोहिमा यशस्वी झाल्यास अमेरिका, रशियानंतर जीपीएस क्रियान्वित करणारा चीन हा जगातील तिसरा देश ठरेल.सीतारमण यांच्या अरुणाचल भेटीवर चीनचा आक्षेप
भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पदावर आल्यावर प्रथमच अरुणाचल प्रदेशला भेट दिली. उभय देशांतील शांतता आणि सौहार्दाला धक्का देणारी ही घटना असल्याचे चीनने म्हटले आहे. अरुणाचल प्रदेशच्या अंजवा जिल्ह्यातील लष्करी स्थानकांची पाहणी या भेटीत सीतारमण यांनी केली. चीनच्या सीमेजवळ हा जिल्हा आहे. येथील सुरक्षा व्यवस्थेविषयी शहानिशा करण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. ही भेट साशंकता निर्माण करणारी आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता हुआ यांनी म्हटले आहे.