आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथे हजारो फूट उंचीच्या पर्वतावर उघडतो 'स्वर्गाचा दरवाजा', जो सम्राटाचे प्रतिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- जगभर अनेक अशी जबरदस्त ठिकाणे आहेत ज्याबाबत आपल्याला माहिती मिळताच दंग होतो. अशी ठिकाणे माणसाला खूप आकर्षित करतात. यातील काही ठिकाणे माणसाने बनविली आहेत तर काही निसर्गाची देण आहे. असेच एक ठिकाण म्हणजे चीनचे तियानमेन माउंटेन, जे तेथील प्रमुख टूरिस्ट अट्रॅक्शन सुद्धा आहे.
खरं तर हे ठिकाण 1518 मीटर ऊंच (म्हणजे जवळपास 5 हजार फूट) इतके जगातील सर्वात ऊंच पर्वत गुहा आहे. या गुहेला स्वर्गाचा दरवाजा असेही म्हटले जाते. ढगाच्या मध्ये ही आहे गुफा...
याबाबत सांगितले जाते की, 253 ईसवी सनमध्ये या पर्वताचा काही भाग तुटला ज्यामुळे ही गुहा तयारी झाली. याची लांबी 196 फूट, ऊंची 431 फूट तसेच रूंदी 187 फूट आहे. सुमारे 5 हजार फूट ऊंचीवर असलेली ही गुहा कायम ढगांत सामावलेली असते. कदाचित याचमुळे लोक याला स्वर्गाचा दरवाजा म्हणतात.
टूरिस्ट येथे जाण्यासाठी रस्त्याशिवाय रोप वे (केबल वे)चा उपयोग करतात. जगातील सर्वात लांब (24459 फूट) आणि उंचीवर बनलेल्या या केबल वेची गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद आहे. केबल वे आणि रस्त्यावरून तेथे पोहचल्यानंतर लोकांना 999 पाय-या चढून गुफांत जावे लागते. ताओ फिलॉसिफीनुसार, हे 999 स्टेप सुप्रीम नंबर आहे आणि सम्राटाचे प्रतीक आहे.
कधी होता वाटरफॉल-
20 व्या शतकात तियानमेन माउंटेनजवळ एक वाटरफॉल सुद्धा होता, जो फक्त 15 मिनिटांसाठी दिसायचा. यानंतर तो गायब व्हायचा. याचे पाणी 1500 मीटरच्या ऊंचीवरून सरळ खाली पडायचे. मात्र, आता या वाटरफॉलचा काहीही नामोनिशान दिसत नाही. तर, या माउंटेनबाबत म्हटले जाते की, येथे खूप काही खजाना, संपत्ती लपवून ठेवली आहे. हे शोधण्यासाठी लोकांनी अथक मेहनत घेतली मात्र काहीही हाती लागले नाही. येथे बौद्ध मठ सुद्धा आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, स्वगाचा दरवाजा मानल्या जाणा-या तियानमेन माउंटेनचा नजारा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...