आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिबेटच्या सीमेवर चिनी लष्कराची जमवाजमव; चीनमधील माध्यमांचा दावा, तणाव वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युद्ध सरावानंतर आता चीनने सैनिकांचा ताफा तिबेटमध्ये तैनात केला आहे. (फाईल) - Divya Marathi
युद्ध सरावानंतर आता चीनने सैनिकांचा ताफा तिबेटमध्ये तैनात केला आहे. (फाईल)
बीजिंग- तिबेटमध्ये भारतीय सीमेनजीक चीनने आपल्या लष्कराची जमवाजमव केली असून शस्त्रास्त्रांचे साठेही वाढवण्यास प्रारंभ केला आहे. सिक्कीममधील डोकलाम क्षेत्रावरून दोन्ही देशांत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी लष्कराचे मुखपत्र असलेल्या ‘पीएलए डेली’ने हा दावा केला आहे.

चिनी लष्कराने रेल्वे व रस्तेमार्गाने उ. तिबेटमध्ये कुनलून पर्वतराजीत हजारो टन लष्करी सामग्री जमवली असून डोकलामपासून हा भाग अत्यंत जवळ आहे. सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर यावर लक्ष ठेवून असलेल्या वेस्टर्न थिएटर कमांडने जूनअखेरीस लष्कराच्या जमवाजमवीची तयारी सुरू केली होती. मात्र, ही जमवाजमव लष्कराच्या सरावासाठी आहे की याचा उद्देश भारतावर दबाव टाकणे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. डोकलाममधील चिनी सैनिकांच्या घुसखोरीनंतर भारतीय सैनिकांनी केलेल्या प्रतिकाराच्या पार्श्वभूमीवर भारतावर दबाव वाढवणे हा पण या सज्जतेचा उद्देश असू शकतो.
 
हे ही वाचा...
 
बातम्या आणखी आहेत...