आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्‍ये इमारतींपुढे सरकार होते नतमस्तक,का वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: नॅनिंग शहरातील बहुमजली इमारतींच्या मधोमध असलेले कौलारु घर.
बीजिंग - लहान मुलांमध्‍ये हट्टीपणा असणे ही सामान्य बाब झाली. पण तुम्ही कधी हट्टी इमारतींविषयी ऐकले आहे का? चीनमध्‍ये अशी अनेक इमारती आहेत,ज्यांच्या पुढे च‍िनी सरकार नतमस्तक झाले आहे. सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करु शकत नाही. आता पाहा छायाचित्रांमध्‍ये रस्त्याच्या मधोमध असलेले कौलारु घर.स्थानिक प्रशासनाने संबंधित घर मालकाला योग्य मोबदला न द‍िल्याने त्याने घर पाडण्‍यास नकार दिला आहे.
चीनच्या नॅनिंगमध्‍ये याच ठिकाणी कधीकाळी एक वसाहत होती.स्थानिक प्रशासनाने येथे बहुमजली इमारत बनवण्‍याचा निर्णय घेतला. लोकांना योग्य मोबदला देऊन ती खाली करण्‍यात आली. परंतु प्रशासनाला एका घर मा‍लकाला त्याच्या मागणीनुसार मोबदला मिळाला नाही. मग काय होणार, त्याने घर पाडण्‍यास मनाई केली. आता चहूबाजूने बहुमजली इमारती असून मध्‍येच कौलारु घर जसेचे तसे असून परंतु प्रशासनला ते हटवण्‍यास अद्यापही यश आलेले नाही.

इमारती का होतात जिद्दी ?
चीनमध्‍ये अशा इमारतींना दिनझीहू म्हणजे नेल हाऊस असे म्हटले जाते. कारण त्यांना हटवणे खूप अवघड असते. वास्तवात सरकार व बांधकाम विकासकांकडून योग्य मोबदला न मिळाल्यास घर मालक आपल्या घराची जागा देत नाही. याचा परिणाम म्हणजे अवती भोवती खूप बदल होते. पण इमारत जसे के तसे राहतात.

पुढील स्लाइड्सवर वाचा, चीनच्या दुस-या जिद्दी इमारतींविषयी...
बातम्या आणखी आहेत...