आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या ‘अग्नी’मुळे चीनला ‘पोटदुखी’ संयुक्त राष्ट्राच्या नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- भारताच्या अग्नी या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमातून संयुक्त राष्ट्राच्या नियमांची पायमल्ली झाली आहे, असा आरोप चीनने केला आहे. भारताने अलीकडेच अग्नी-४ व अग्नी-५ ची चाचणी घेतली होती. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीनदेखील येते. त्यामुळे चीनची ‘पोटदुखी’ वाढली आहे.   भारताने क्षेपणास्त्रे बनवणे थांबवले नाही तर आम्ही पाकिस्तानला मदत करू, असा इशाराही दिला आहे. 
 
संयुक्त राष्ट्राच्या क्षेपणास्त्र निर्मितीच्या मर्यादांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राने काही नियम घालून दिले आहेत, असे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या एका लेखात म्हटले आहे. भारतच नव्हे तर अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य देशांनी अणू कार्यक्रमाविषयी घालून दिलेल्या नियमांचा भंग केला आहे. भारताच्या क्षेपणास्त्राची क्षमता आंतरखंडीय स्वरूपाची आहे, असे सांगून चीनने नाराजी व्यक्त केली आहे. 

धोका मुळीच नाही  
अग्नी-५ क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीनचे सगळे महत्त्वाचे भाग येतात. परंतु त्यामुळे सरकार भारताच्या अणू कार्यक्रमाला घाबरत नाही. त्यामुळे धोका असल्याचे आम्हाला मुळीच वाटत नाही, असे चीनने म्हटले आहे. दीर्घ स्पर्धेत भारत आमचा स्पर्धक आहे, असे आम्ही मानत नाहीत, असे चीनने संपादकीयमधून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.  
बातम्या आणखी आहेत...