आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्याला 2020 पर्यंत मॉर्डनाइज करणार चीन, भारताचा धोका वाढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनने 2020 पर्यंत आपले सैन्य अत्याधुनिक करण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 'पिपुल्स लिबरेशन आर्मी'च्या सर्व शाखांना अधिक शक्तीशाली करण्याचे वचन दिले. त्यासोबतच युद्धासाठी सदैव तयार राहाण्याचे फर्मान सोडले. चीनच्या या घोषणांनी भारताच्या चिंतेत भर पडली आहे. कारण भारतीय सैन्य अजूनही दारु-गोळा आणि संरक्षण बजेटच्या कमतरतेसोबत लढत आहे. दुसरीकडे, शेजारी देश स्वतःला अधिक शक्तीशाली करण्यात व्यस्त आहेत. विशेष म्हणजे, चीन आर्मी जगातील सर्वात मोठी आर्मी आहे. त्यांच्या सैनिकांची संख्या भारतीय सैन्यापेक्षा दुप्पट आहे.
सैन्याला कसे बळ देणार चीन
>> शिन्हुआ न्युज एजन्सीच्या वृत्तानुसार जिनपिंग म्हणाले, चीनी लष्कराच्या सर्व तुकड्यांचे पुनर्निर्माण करण्यासाठी एक जॉइंट ऑपरेशनल मिलिटरी कमांड तयार केली जाईल.
>> 2020 पर्यंत चीनला एलाइट कॉम्बेट फोर्स तयार केली जाईल.
>> यात चीनच्या चार मुख्य क्षेत्रांमधील सात मिलिटरी विभागांचे रिग्रुपिंग केले जाईल.
>> चीनने त्यांच्या लष्कराचे पुनर्निर्माण सोव्हिएत संघाच्या धर्तीवर करण्याची योजना आखली आहे.
भारतीय योजनांना निर्माण होणार धोका ?
>> चीन सरकारने हे निश्चित केले आहे, की त्यांचे आफ्रिकी देशांसोबत ओव्हरसीज लॉजिस्टिक फॅसिलिटीवर बातचित सुरु आहे.
>> याचा फायदा चीन अदन खाडीमध्ये समुद्री लुटारूंविरोधात पेट्रोलिंग सुरु करु शकेल.
>> जर हा करार यशस्वी झाला तर हिंद महासागरात चीन प्रथमच आपला नाविक तळ निर्माण करण्यात यशस्वी होईल आणि यामुळे भारतीय योजनांना धोका निर्माण होऊ शकतो.
कारगिल युद्धानंतरही भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाची झाली होती मागणी
>> भारतीय लष्कराने 1999 च्या कारगिल युद्धानंतर लष्कराला मार्डनाइज करण्याची शिफारस केली होती.
>> 2001 मध्ये लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ समितीने नॅशनल सेक्युरिटी रिफॉर्मची चर्चा केली होती.
>> त्यातील काही शिफारसी लागू केल्या गेल्या आहेत.
>> मात्र, तिन्ही सेना प्रमुखांच्या वर चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) हे पद निर्माण करण्याचा प्रस्ताव थंड बस्त्यात टाकण्यात आला.