आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक कॉरिडॉरच्या सुरक्षा खर्चाबाबत चीन घाबरला, बलुचिस्तानमध्ये विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीन-पाकिस्तानच्या ४६ अब्ज डॉलरच्या आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या वाढत्या सुरक्षा खर्चावरून चीनने आपली चिंता सरकारी प्रसिद्धिमाध्यम ग्लोबल टाइम्समध्ये केली
आहे. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्प दोन्ही देशांसाठी सहजसाध्य होणारा नसल्याचे संकेत
मिळत आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या या प्रकल्पास गुंतागुंतीच्या प्रादेशिक वातावरणामुळे जोखमीला सामोरे जावे लागत आहे. कॉरिडॉरमध्ये कार्यरत चिनी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानने १४,५०३ सुरक्षा रक्षकांना तैनात केले, याचाही संदर्भ लेखात देण्यात आला आहे. या प्रदेशावर सर्वाधिक भर देण्याची चीनची इच्छा नाही. यामुळे सर्व अंडी एकाच बास्केटमध्ये टाकण्याचा अव्यावहारिकपणा ठरू शकतो. यातून चीनची चिंता स्पष्टपणे दिसत आहे.
४ सप्टेंबर रोजी जी २० परिषदेला लागून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी केलेल्या चर्चेत संबंधित प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली होती, हे इथे उल्लेखनीय आहे. असे असले तरी लेखात प्रकल्पावरून भारताचा कोणताही संदर्भ देण्यात आला नाही. आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार चीनच्या झिजियांग प्रांतापासून पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील ग्वादर बंदरापर्यंत आहे. प्रकल्प रेल्वे, रस्ता आणि पाइपलाइनद्वारे जोडला जाणार आहे. सीपीईसी(चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर) प्रकल्पाकडे उभय देशांतील आर्थिक सहकार्य संबंधांतून पाहिले जात आहे. सीपीईसीबाबत चीन आपल्या धोरणात बदल करेल असे वाटत नाही. मात्र, प्रकल्पाच्या सुरक्षेवर होणारा वाढता खर्च ही मुख्य समस्या आहे. प्रकल्प परिणामकारकरीत्या पूर्ण करण्यात ही एक अडचण आहे.
शरीफ यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शरीफ यांनी पाकमध्ये कार्यरत चिनी कर्मचाऱ्यांची सुरक्षेत अडचण येत असल्याचे म्हटले होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, नरेंद्र मोदींनी जिनपिंग यांच्याकडे नोंदवला होता अाक्षेप
बातम्या आणखी आहेत...