आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Planning To Build Floating Nuclear Power Plant

2020 पर्यंत समुद्रात अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची चीनची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीन नॅशनल न्युक्लिअर कॉरपोरेशन प्लान्टची ग्राफिक्स इमेज. - Divya Marathi
चीन नॅशनल न्युक्लिअर कॉरपोरेशन प्लान्टची ग्राफिक्स इमेज.
बीजिंग - चीनने 2020 पर्यंत अणुऊर्जेचे उत्पादन दुप्पट करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, चीन पाण्यावर तरंगणारे न्युक्लिअर पॉवर स्टेशन तयार करत आहे. पुढील दशकापर्यंत 100 अतिरिक्त न्युक्लिअर रिअॅक्टर लावण्याची योजनाही चीन आखत आहे.

समुद्रातील नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करण्याचा उद्देश
- चीनच्या अॅटोमिक एनर्जी अथॉरिटीचे चेअरमन शू डाजे यांनी सांगितले की, चीन मेरीटाइम पॉवरमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे. लवकरच आम्ही समुद्रातील साधनसंपत्तीचा वापर करणार आहोत.
- त्यांनी सांगितले की, या ऊर्जा प्रकल्पांमधून ऑइल आणि गॅस ड्रीलिंग, बेटांचा विकास आणि दुर्गम भागात पॉवर सप्लाय करता येऊ शकेल.
- चीन जनरल न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन (सीजीएन) बीजिंगमध्ये दोन न्युक्लिअर प्लांट तयार करत आहेत.
- पुढील महिन्यामध्ये इतर दोन कंपन्याही फ्लोटिंग प्लान्ट तयार करण्याची घोषणा करू शकतात.

रशियाने बनवला आहे तरंगणारा पहिला पॉवर प्लान्ट
- रशियाने जगातील पहिला पाण्यावर तरंगणारा न्युक्लिअर पॉवर प्लान्ट तयार केला आहे.
- त्यापासून वीजेची कमतरता असलेल्या भागांपर्यंत वीजसेवा पोहोचवता येऊ शकेल. या माध्यमातून पाणी नसलेल्या भागांमध्ये स्वच्छ पाणी पोहोचवणेही सोपे होईल.
- सप्टेंबर 2016 पासून याठिकाणी वीज उत्पादनाला सुरुवात होऊ शकेल.

2020 पर्यंत 58 गेगावॅट वीजेचे उत्पादन करणार
- सध्या चीनकडे 30 न्युक्लिअर रिअॅक्टर्स आहेत. त्यांची क्षमता 28.3 गेगावॅट आहे.
- 2020 पर्यंत ही क्षमता 58 गेगावॅटपर्यंत पोहोचवण्याचे चीनचा उद्दीष्ट आहे.
- इतर 24 रिअॅक्टर्सवर काम सुरू आहे. त्याची क्षमता 26.7 असेल.
- 2020 पर्यंत त्यातून 30 गेगावॅट वीज उत्पादन करण्याचा विचार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS