आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये २८ दहशतवाद्यांचा खात्मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत किमान २८ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्याअगोदर दोन महिन्यापूर्वी दहशतवादी गटाने शिनजियांग प्रांतातील एका कोळसा खाणीत केलेल्या हल्ल्यात १६ मजुरांचा मृत्यू झाला होता.

हल्ल्यानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांचा पाठलाग केला, परंतु डोंगराळ भागातून दहशतवादी पळ काढण्यात यशस्वी ठरले. त्या घटनेनंतर पोलिसांनी या भागात सातत्याने गस्त वाढवली होती. अखेर अतिरेक्यांचा त्यांनी खात्मा केला.