आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राला पाठकुळी घेऊन शाळेत, तीन वर्षांपासून दिनक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनचा १९ वर्षीय झांग ची याच्या स्नायूंमध्ये शिथिलता आहे. त्याचे पाय यामुळे अधू असून तो कोणतेही काम करू शकत नाही. थोडक्यात तो अपंग आहे. मात्र, त्याचा १८ वर्षीय मित्र शेई शू हा मित्राला कधीही अपंगत्वाची जाणीव होऊ देत नाही. शेई या आपल्या प्रिय मित्राला दररोज पाठकुळी घेऊन शाळेत जातो. याशिवाय प्रत्येक ठिकाणी तो मित्रास मदत करतो. शिक्षकांनाही या दोन्ही विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान वाटतो. झांग आणि शेई आता एखाद्या चांगल्या विद्यापीठात प्रवेश घेऊन उच्च शिक्षण घेऊ इच्छितात.

तीन वर्षांपासून दिनक्रम
शेई तीन वर्षांपासून झांगला आपल्या पाठीवर घेऊन शाळेत जातो. शाळेत सर्वत्र शेईच झांगला फिरवतो. घरी आणून पोहोचवण्यापर्यंतची जबाबदारी शेईने घेतली आहे. शेईच्या मैत्रीवर झांगला फार गर्व आहे. छोट्याशा वयातच त्यांनी मैत्रीचा खरा अर्थ सिद्ध केला.

दोघे गुणवत्ताधारक
दोघेही आपापल्या वर्गात अव्वलस्थानी आहेत. शाळेत ये-जा करण्यासाठी तर ते सोबत असतातच. शिवाय अभ्यास करतानाही ते परस्परांना सर्व मदत करतात.