आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता प्रवासी विमानही मेड इन चायनाचे: देश विदेशातून मिळाल्‍या 517 ऑर्डर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चायनाने आता प्‍लेन बनवायलाही सुरूवात केली आहे. चीनने पहिले होममेड पॅसेंजर एयरक्राफ्ट बनवले आहे. सोमवारी शंघाईमध्‍ये पहिल्‍यांदा C919 हे मेड इन चायना पॅसेंजर प्लेन जनतेसमोर सादर करण्‍यात आले. हे विमान कमर्शियल एयरक्राफ्ट कॉर्पोरेशन ऑफ चाइना लिमिटेड (कोमेक) या सरकारी संस्‍थेने बनवले आहे.
517 एयरक्राफ्ट बनवण्‍याची ऑर्डरही मिळाली
कोमेकने सांगितले की, देश आणि विदेशात 21 क्लाइंट्सनी 517 एयरक्राफ्ट बनवण्‍याची ऑर्डर दिली आहे. थाइलॅंड सिटी एयरवेजने 10 प्लेन ऑर्डर केले आहेत. चीनच्‍या या पावलाने प्‍लेन तयार करणा-या कंपनी बोइंग आणि एयरबसची चिंता वाढू शकते.
काय आहे विशेष ?
> या विमानात एकावेळी 168 प्रवासी प्रवास करू शकतात.
> विमानाची स्टँडर्ड फ्लाइट रेंज 4075 किलोमीटर आहे.
> या विमानाची वजनाची क्षमता 20.4 मीट्रिक टन आहे.
> जास्‍तीत जास्‍त 39,800 फूट उंच उड्डाण हे विमान घेऊ शकते.
> कोमेकने या प्रोजेक्‍टची सुरूवात 28 ऑक्‍टोबर 2010पासून केली होती.
या देशातही तयार होतात प्रवासी अाणि व्‍यावसायिक विमाने
देशकंपनी
अमेरिकाबोइंग
फ्रांस, जर्मनी, स्पेन, यूकेएयरबस
ब्राझील
एम्ब्रेयर
कनाडाबॉम्बार्डियर
चेक रिपब्लिकलेट कूनोवाइस
फ्रांस, इटलीएटीआर
जपानमित्सुबिशी
रशियायूनायटेड एयरक्राफ्ट कॉर्पोरेशन
यूक्रेनएंतोनोव
नामांकित कंपन्यांची चिंता वाढली
चीनच्‍या या यशस्‍वी पावलानंतर जगभरातील विमान बनवणा-या कंपन्‍यांचे धाबे दणाणले आहेत. प्रवाशी विमान बनवणारी कंपनी बोइंग आणि एयरबसची यामुळे चिंता वाढली आहे. सध्‍यातरी आंतरराष्‍ट्रीय बाजारात या दोन कंपन्‍यांचे सर्वाधिक शेयर आहेत.
50 हजार कोटी रूपयांचा प्रकल्‍प
C919 च्‍या प्रकल्‍पावर झालेल्‍या खर्चाची माहिती नसली, तरी बँक ऑफ चाइनाचे म्‍हणने आहे की, त्‍यांनी कोमेकच्‍या एयरक्राफ्ट प्रकल्‍पासाठी 7.9 बिलियन डॉलर म्‍हणजे 50 हजार कोटी रूपये घेतले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, मेड इन चायना प्रवासी विमानाचे फोटो..