बीजिंग- बेभरवशाचा पाऊस आणि भीषण दुष्काळाच्या आगीत होरपळत असलेल्या मराठवाड्यावर चीनच्या अत्याधुनिक क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाद्वारे पावासाच्या धारा बरसवल्या जाणार आहेत. गरज भासल्यास पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यातच म्हणजे मे २०१७ मध्येच मराठवाड्यात पाऊस पाडण्याचे लक्ष्य असून त्यासाठी हे तंत्रज्ञान आणि त्याच्या हाताळणीचे प्रशिक्षण हवामान खात्यातील स्थानिक अधिकाऱ्यांना देण्याची तयारीही चीनने दाखवली आहे.
बीजिंग, शांघाय आणि चीनच्या अन्हुई प्रांतातील शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांचे एक पथक नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर होते. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात पडलेला भीषण दुष्काळ पाहून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्वत: होऊनच अत्याधुनिक क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञान भारतीय हवामान खात्यातील स्थानिक कर्मचाऱ्यांना त्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली. यंदा मेच्या प्रारंभीच शांघायचे वरिष्ठ अधिकारी हान झेंग मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीसांची मुंबईत बैठक झाली होती. महाराष्ट्राला सततच्या या दुष्काळातून दिलासा मिळावा यासाठी चीन काही करू शकतो का? अशी विचारणा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
पथदर्शी प्रकल्प सादर करण्याची सूचना> पथ दर्शी प्रकल्पसादर करण्याची सूचना चिनी अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा विचार शासन करेल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री