आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा जपानसोबतचा संयुक्त नौदल सराव, चीनकडून जाहीर नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजींग - भारत-अमेरिका यांच्यातील वार्षिक मालाबार नौदल सरावात जपानला सहभागी करून घेण्याच्या निर्णयावर चीनने सोमवारी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. जपानने प्रदेशात कोणत्याही तणावाचे कारण ठरू नये, असा सूचक आशावाद चीने व्यक्त केला.

आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. जपानने प्रदेशात तणाव निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाँग लेई यांनी सांगितले. मालाबार सागरी प्रदेशात दरवर्षी भारत आणि अमेरिका यांच्यात हा नौदल सराव केला जातो. त्यात जपानला सहभागी करून घेण्यात आल्याने चीन बिथरल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे भारत दौऱ्यावर होते. त्यावेळी जपानच्या सहभागाची घोषणा करण्यात आली होती. सागरी क्षेत्रातील स्वातंत्ऱ्याचा अधिकार प्रत्येक देशाला आहे.
त्याचा चीन आदर करतो.

शांततेसाठी अणुऊर्जेचा अधिकार : प्रत्येक देशाला अणुऊर्जेचा नागरी वापर करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भारत-जपान यांच्यातील आण्विक करार स्वाभाविक आहे. परंतु करार करताना आंतरराष्ट्रीय नियमांचे कटाक्षाने पालन केले गेले पाहिजे, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...