आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Ready For Signing Friendship Treaties With Neighbours Xi Jinping

चीन शेजारील राष्‍ट्रांशी करणार मैत्रीचे करार - शी जिनपिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: चिनी राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग
बीजिंग - शेजारील राष्‍ट्रांशी चीन मैत्रीचे करार करण्‍यास तयारी असल्याचे चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांनी शन‍िवारी(ता.28) सांगितले. 40 अब्ज अमेरिकन डॉलरचा सिल्क रोड प्रकल्पाचा कृती आराखडा जिनपिंग यांनी सादर केला. ते चीनच्या हैनान बेटावर आयोजित केलेल्या बोएओ फोरम फॉर एशियाच्या वार्षिक पर‍िषदेत बोलत होते.मैत्रीपूर्ण सहकार्य करार चीनने आठ शेजारील राष्‍ट्रांशी केलेला आहे. असाच करार इतर सर्व शेजारील राष्‍ट्रांशी करण्‍याची इच्छा चिनी राष्‍ट्राध्‍यक्षांनी व्यक्त केला आहे. यामुळे द्विपक्षीय संबंधांना पाठबळ मिळेल आणि समृध्‍दता तसेच स्थिरता भूप्रदेशात प्रस्थापित होईल.