Home »International »China» China Said India Can Not Share Brahmaputra Data But Ready To Talk On Reopen Nathu La Pass

कैलाश मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु करण्यास भारतासोबत चर्चेला तयार - चीन

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 17:51 PM IST

बीजिंग - डोकलाम वादामुळे थांबवण्यात आलेली कैलाश-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. चीनने म्हटले आहे की, भारतीय यात्रेकरुंचा मार्ग मोकळा करण्यावर बातचीत करण्याची आमची तयारी आहे. मात्र ब्रम्हपुत्र नदीचा हायड्रोलॉजिकल डाटा भारतासोबत शेअर करण्यास बीजिंगने नकार दिला आहे.

- वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी मंगळवारी सांगितले, 'चीन नाथुला खोरे पुन्हा एकदा भारतीय यात्रेकरुंसाठी मोकळे करु शकते. त्यासाठीची चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. बऱ्याच वर्षांपासून चीन भारतीय यात्रेकरुंसाठी अनेक आवश्यक सुविधा पुरवत आले आहे. भारत-चीन सीमेच्या वेस्टर्न सेक्शनमध्ये दोन्ही देशांदरम्यान झालेल्या कराराला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसारच भारतीय यात्रेकरुंसाठी नाथुला खोरे खुले केले जात आले आहे.'
- 'मात्र भारतीय सैनिकांनी अवैधरित्या सीमापार केल्याने वाद निर्माण झाला होता त्यामुळे नाथुला खोरे बंद करण्यात आले होते.'

1981 मध्ये सुरु झाली होती यात्रा
- भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मानसरोवर यात्रा 1981 मध्ये सुरु केली होती. तेव्हा या यात्रेचा प्रवास हिमालयातील लिपू खोऱ्यातून जात होता. त्यानंतर उत्तराखंडच्या कुमायूंला तिबेटच्या पुरातन व्यापारी शहर ताकलाकोटला जोडलेले होते. 2015 मध्ये सिक्कीममधून जाणारा मार्ग मानसरोवर यात्रेसाठी खुला करण्यात आला होता.

Next Article

Recommended