आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Says Pm Modis Visit To Arunachal Pradesh Not Conducive To Resolve Border

मोदींच्या अरुणाचल प्रदेश दौर्‍याने चीन संतप्त, म्हणाले - असा तर सीमाप्रश्न सुटणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अरुणाचल प्रदेश दौर्‍यावर चीने नाराजी व्यक्त केली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी एका लिखीत वक्तव्यात म्हटले आहे, की भारताकडून सध्या सुरु असलेल्या हलचालीने सीमा वादावर तोडगा काढणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत हा वाद संपेल असे वाटत नाही. चुनयिंग म्हणाले, 'आम्हाला वाटते, भारताने आमच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन सीमा वादाच्या सोडवणूकीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्या दिशेने काम केले पाहिजे. चर्चेने हा प्रश्न सुटू शकतो.' पंतप्रधान मोदी रविवारी अरुणाचल प्रदेशाच्या दौर्‍यावर जाणार आहेत.

याच वक्तव्यात चुनयिंग यांनी आरोप केला, की चुकीच्या पद्धतीने 1987 मध्ये भारतीय गणराज्यात अरुणाचल प्रदेशाचा समावेश केला आणि त्याला राज्य घोषित केले.
चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या या लिखित वक्तव्यात अरुणाचल प्रदेशाला भारताचे 'कथित राज्य' म्हटले आहे. चीनच्या तीन प्रदेशांचे मिळून हे राज्य तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चीनच्या तिबेट भागातील मोन्याल, लोयुल आणि सायुल यांना एकत्र करुन भारताने चुकीच्या पद्धतीने कथित राज्य तयार केले आहे. त्यांनी म्हटले, की मॅकमोहन रेषेला लागून असलेला हा भाग प्रामुख्याने चीनचा आहे.
आजपर्यंत भारताच्या ज्या-ज्या पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेशाचा दौरा कला आहे, त्यावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. 2009 मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी या भागाचा दौरा केला होता, तेव्हाही चीनने विरोध केला होता. तसेच 2013 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या प्रदेशाचा दौरा केला तेव्हाही चीने वक्तव्य जारी करुन भारताला इशारा दिला होता, प्रथम हा वाद सोडवण्यासाठी पुढाकार घ्या.