आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरू, अमेरिकेला धास्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीन आपल्या अण्वस्त्रांना अत्याधुनिक करत असून त्यांचे प्रमाणही वाढवण्यात येत आहे. एका अहवालानुसार चीनजवळ सध्या २३० अण्वस्त्रे आहेत. वॉशिंग्टन येथिल आर्म्स कंट्रोल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार भारतीय अण्वस्त्र आणि रशियाच्या अण्वस्त्रांचा मोठा साठा चीनच्या चिंतेचा विषय नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. अमेरिका हल्ला करेल असे चीनला वाटते. त्यामुळेच चीन आपल्या धोरणाचे समर्थन करत आहे. कोणत्याही परिस्थितीत चीन तडजोड करण्याच्या मानसिकतेत नाही.

‘आशियातील वाढत्या अण्वस्त्रांचा लेखाजोखा’ या नावाने हा अहवाल सादर झाला आहे. अमेरिका आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याने आपण अण्वस्त्रांचा साठा वाढवत आहोत, असे चीनने सांगितले. चीनने अर्ली वॉर्निंग सिस्टिम विकसित केलेली नाही. काही अधिकाऱ्यांनी ही प्रणाली विकसित करण्याचा आग्रह धरला आहे.

२० अणुबॉम्ब अमेरिकेच्या दिशेने : गेल्या दोन दशकांपासून चीनने २० अणुबॉम्ब अमेरिकेच्या दिशेने रोखून ठेवले आहेत. अमेरिकेने चीनच्या दिशेने तैनात केलेल्या अणुबॉम्बच्या तुलनेत ही संख्या केवळ १ % आहे. चीनने गेल्या दशकातच आधुनिकीकरण सुरू केले.
बातम्या आणखी आहेत...