आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारण्याची चीनला आशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहाय्यक परराष्ट्रमंत्री, चीन - Divya Marathi
सहाय्यक परराष्ट्रमंत्री, चीन
बीजिंग- भारत आणि पाकिस्तानमधील संबंधात चर्चेतून सुधारणा होऊ शकते, असे चीनने आज मंगळवार रोजी म्हटले आहे. एसओसी ते सदस्य असल्याकारणाने त्यांच्यात उत्तम संबंध असले पाहिजेत आणि हे सर्व परस्परांवरील विश्वास तसेच बोलण्यांमधून चर्चेच्या फेऱ्यांतूनच शक्य होऊ शकते, अशी आशा चीनला आहे. त्यांच्यात संबंध चांगले असणे आवश्यक आहे कारण ही दोन्ही महत्त्वाची राष्ट्रे चीनचे महत्त्वाचे शेजारी आहेत तसेच दक्षिण आशियातील मोठी महत्त्वाची राष्ट्रे आहेत, अशीही मखलाशीही चीनने केली आहे. 

एसओसीची स्थापना हे अमेरिकी आणि पाश्चात्त्य देशांना उत्तर असून चीनचे महासत्ता होण्यातील एक महत्त्वाचे पाऊल अाहे, असे मुत्सद्द्यांना वाटत आहे.  चीनला आशा आहे की, भारत पाकिस्तान परस्परांवर विश्वास दाखवून संबंधात बोलण्यांमधून प्रगती करतील.
बातम्या आणखी आहेत...