आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरवर चीनचा पाकिस्तानला पाठिंबा; अनेक सहमती करारांवर चीनकडून स्वाक्षरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- पाकिस्तान व चीन यांच्यात शनिवारी अनेक सहमती करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. पंतप्रधान नवाज शरीफ व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झालेल्या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. चीनने काश्मिरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला आपल्या पाठिंब्याचे वचन दिले आहे.

चीनच्या वन बेल्ट वन रोड (आेबोर) संमेलनात शरीफ सहभागी झाले आहेत. त्यांच्यासमवेत चारही प्रांतांचे मुख्यमंत्री देखील आहेत. आेबोरमध्ये सुमारे ६५ देश चीनसोबत आहेत. त्यात भारताचा समावेश नाही. चीन व पाकिस्तान यांच्यात आर्थिक व तांत्रिक सहकार्यावर तीन सहमती करार झाले. त्यानुसार चीन पाकिस्तानमध्ये ३.४ अब्ज युआन ग्वाडेर बंदर व ईस्ट बे एक्स्प्रेस वे वर खर्च करणार आहे. त्या शिवाय चीन पाकिस्तानातील बंदरांना देखील विकसित करणार आहे. एम-१ मुख्य रेल्वे रुळाला देखील विकसित करणार आहे. समझोत्यांवर स्वाक्षरी करतेवेळी पंतप्रधान नवाज शरीफ व चीनचे पंतप्रधान ले केकियांग उपस्थित होते. त्याशिवाय पाकिस्तानातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज देखील उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...