आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजावरील बंदी, चीनमध्ये हल्ला; कशगर जिल्ह्यात प्रचंड तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये मुस्लिमांना रमजानच्या महिन्यात रोजा धरण्यास बंदी लादल्यानंतर मुस्लिमबहुल भागात तणाव वाढला आहे. पश्चिम राज्य शिंजियांगमध्ये उघूर मुस्लिम दहशतवाद्यांनी पोलिस चौकीवर चाकू व बॉम्बहल्ला केला. यामध्ये १८ पोलिस ठार झाले. यानंतर पोलिसांनी १५ हल्लेखोरांना ठार केले.

हा हल्ला सोमवारी शिंजियांगच्या दक्षिणेतील शहर कशगरच्या वाहतूक चौकीवर रमजानच्या सुरुवातीस झाला. याबाबतची माहिती पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांतून बुधवारी समोर आली. या भागात मुस्लिम उघूर समुदाय आणि चीनच्या हान समुदायात संघर्ष सुरू आहे. अमेरिकेच्या रेडिओ फ्री एशियाने सांगितले की, कशगरच्या टाइटाकोरुक जिल्ह्यात एका भरधाव कारने वाहतूक चौकीला उडवले. यानंतर संशयित लोकांनी बॉम्ब आणि चाकू घेऊन पोलिस अधिकार्‍यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. पोलिस अधिकारी तुर्घुन मेमेट म्हणाले, सशस्त्र पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत १५ हल्लेखोर ठार झाले. पोलिसांनी त्यांना अतिरेकी ठरवले आहे.

उघूर संस्कृतीचा वाद
चीन उघूर संस्कृती नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. हा हल्ला त्याविरोधात असल्याचे मानवी हक्क संघटनांचे म्हणणे आहे. चीन सरकारने दिलेल्या आदेशात रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व शिक्षण संस्था, कार्यालये, हॉटेल व रेस्तराँ सुरू राहतील. विद्यार्थी आणि पालक रोजा धरणार नाहीत आणि ते मशिदीत जाणार नाहीत याकडे लक्ष देण्यास शिक्षकांना सांगण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...