आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिबेटच्या जोरावर चीन टक्कर देणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - उपखंडासह जगभरात भारताचा दबदबा वाढत आहे. भारताला टक्कर देण्यासाठी शेजारच्या नेपाळ व बांगलादेशमध्ये व्यापार व गुंतवणुक करण्यासाठी तिबेट महत्वाचा प्रदेश ठरू शकतो, असे चिनी सरकारला वाटू लागले आहे. प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या जोरावर भारताला वरचढ ठरण्यासाठी कायम ठेंगा दाखवणाऱ्या तिबेटशी जुळवून घेण्याची रणनीति चीन आखू लागला आहे.
नेपाळमध्ये रेल्वे मार्गाचे जाळे बांधण्यात येणार आहे. त्याचे काम मिळवण्यासाठी भारत व चीन यांच्यात स्पर्धा लागली आहे. त्यातच आता तिबेटने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे चीनची गोची होणार आहे. भारताचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे, असे चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने एका लेखात म्हटले आहे. भारताची वाटचाल अशी सुरू राहिल्यास आगामी दशकात कधी ना कधी चीनची चहुबाजूंनी कोंडी होऊ शकते. भारताचा कायम दबाव सहन करावा लागेल, या विचारांनी चिनी राज्यकर्ते धास्तावल्याचे वृत्तपत्रातील लेखातून स्पष्ट झाले
वन रोडसाठी भूमिका : चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट व वन रोड प्रकल्पावर सध्या काम सुरू आहे. त्याचा फायदा भारत, तिबेट, बांगलादेशला होणार आहे. ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली तर भारतासह सर्वच देशांच्या विकासाला फायदेशीर ठरू शकेल, असे चीनकडून सांगण्यात आले.
नेपाळमधील व्यापारावर डोळा
भारताने वर्षानुवर्षे नेपाळशी चांगली भागीदारी केली आहे. त्यामुळेच नेपाळच्या एकूण व्यापारात भारताचे ६० ते ७० टक्के व्यापार वर्चस्व राहिले आहे. तुलनेने चीनचे प्रमाण १० टक्के आहे. त्यामुळेच चीनने भारतावर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा शेजारी राष्ट्रामधील व्यापारावर डोळा आहे.
बातम्या आणखी आहेत...