आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या राजदूतांच्या दौऱ्याला चीनचा आक्षेप; रिचर्ड वर्मा दिवसांपूर्वी गेले होते अरुणाचलमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- भारतातील अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा २२ ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेशमधील तवांगच्या दौऱ्यावर गेले होते. चीनने दोन दिवसांनंतर त्याला तीव्र आक्षेप घेतानाच अमेरिकेला इशाराही दिला. हा वादग्रस्त भाग आहे. भारत आणि चीन मिळून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, कोणत्याही तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपामुळे हा वाद आणखी जटिल होईल, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लू कांग यांनी व्यक्त केली आहे.

चीन भारताच्या अरुणाचल प्रदेशला आपला भाग म्हणतो आणि त्याला दक्षिण तिबेट असे संबोधले जाते. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राजदूत तेथे गेले होते. चीनचे प्रवक्ता लू म्हणाले की, आम्ही अमेरिकेच्या राजदूतांच्या अधिकृत दौऱ्याची दखल घेतली आहे. आम्ही या दौऱ्याला तीव्र विरोध करत आहोत.

वाद असा
अरुणाचलप्रदेश हे भारताचे राज्य आहे. चीन त्यावर दावा सांगतो. सुमारे ३,४४८ किमीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषवरून वाद आहे. हा वाद सोडवण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात १९ वेळा चर्चा झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...