आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवान राग आळवणे भारताने बंद करावे, हे आगीशी खेळणे आहे; चीनचा भारताला इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीने राष्ट्रपती शी जिनपिंग भारतभेटीवर आले होते तेव्हा मोदींनी त्यांच्यासोबत झोपाळ्यावर बसून चर्चा केली होती. - Divya Marathi
चीने राष्ट्रपती शी जिनपिंग भारतभेटीवर आले होते तेव्हा मोदींनी त्यांच्यासोबत झोपाळ्यावर बसून चर्चा केली होती.
बीजिंग - तैवान मुद्द्यावरुन चीनने भारताला इशारा दिला आहे. हा मुद्द्दा उपस्थित करुन राजकारण करत असाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असे चीनने म्हटले आहे. 12 फेब्रुवारी रोजी तैवानच्या तीन महिला खासदारांचे शिष्टमंडळ भारत भेटीवर आले होते. त्यामुळे चीने नाराजी व्यक्त केली आहे. 
 
भारत आगीशी खेळत आहे...
- चीनने तैवान मुद्द्यावर त्यांचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये लेख लिहिला आहे. 
- त्यामध्ये म्हटले आहे, की भारताने तैवान कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला तर तो आगीशी खेळ असेल. दिल्लीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. 
- वृत्तपत्रात म्हटले आहे, की डोनाल्ड ट्रम्प देखील यावर बोलत आहेत. आमचे म्हणणे आहे की सर्वांनी वन चायना पॉलिसीचे स्वागत केले पाहिजे. 
- चीनने भारत-तैवान संबंधावरुन आगपाखड केली आहे.
- ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे, की भारत-तैवानमध्ये उच्चस्तरीय बैठका याआधी झालेल्या नाहीत. मग आता तैवानचे शिष्टमंडळ भारतात का आले होते. भारताने त्यांन का आमंत्रित केले? 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...