आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर काश्मिरातही 'तिसऱ्या देशाचे' सैनिक घुसतील! डोकलाममध्ये भारतीय तंबू पाहून चीन खवळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
बीजिंग - भारतीय सैनिकांनी सिक्कीमच्या डोकलाम परिसरात तंबू ठोकल्याचे पाहता चिनी माध्यम आणि विचारवंत खवळले आहेत. डोकलाम या वादग्रस्त ठिकाणी भूटानने विनंती केली तरीही भारताला तेथे कथित घुसखोरी करता येणार नाही. मात्र, पाकिस्तानने विनंती केल्यास निश्चितच तिसऱ्या देशाचे (चीन) सैनिक काश्मिरात घुसतील अशी धमकी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर वादग्रस्त भागात भूटानसाठीच रस्ते विकसित करत असल्याचा दावा सुद्धा चिनी माध्यमांनी केला आहे. 
 
 
- चीनच्या भारतीय अभ्यास केंद्रातील विचारवंत आणि संचालक लोंग शिंगचुन यांनी ग्लोबल टाईम्ससाठी एक अग्रलेख लिहला आहे. त्यानुसार, "भारताला भूटानने आपली हद्द सुरक्षित करण्याची विनंती केली, तरीही भारतीय सैनिकांना केवळ त्याच भागात शिरकाव करता येईल. वादग्रस्त डोकलाम परिसरात त्यांना येता येणार नाही."
 
- "तरीही भारतीय सैनिका डोकालममध्ये येत असतील, तर भारताच्या लॉजिकनुसार पाकिस्तानकडून विनंती आल्यास भारत-पाकमध्ये वादग्रस्त असलेल्या काश्मिरात सुद्धा तिसऱ्या देशाचे लष्कर थेट घुसवले जाऊ शकतील." 
 
- भारत आणि भूटानचा सिक्कीमच्या डोकालम परिसरात चिनी बांधकामास तीव्र विरोध आहे. तरीही हे बांधकाम भूटानच्या विनंतीवरून केले जात असल्याचा खोटा दावा चीन करत आहे. याच मुद्यावरून भारत आणि चीनमध्ये गेल्या 25 दिवसांपासून वाद चिघळला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालय आणि चिनी माध्यमांकडून भारताला दररोज धमकावले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने डोकलाम परिसरात जाऊन तंबू ठोकले आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...