बीजिंग - चीनमध्ये यापुढे सरकारी अधिकारी बैठकीच्या नावाखाली पर्यटन स्थळावर सरकारी पैशांनी मौजमजा करू शकणार नाहीत. सरकारने २१ रमणीय ठिकाणांवर बैठकीसाठी बंदी घातली आहे. जगभरातील पर्यटकांना ही ठिकाणे नेहमीच आकर्षित करतात. यातील काही ठिकाणी जागतिक वारसास्थळाच्या यादीत येतात.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये याबाबतचे आदेश बजावण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही सरकारकडून देण्यात आला आहे. चीनमध्ये प्रशासकीय पातळीवर निसर्गरम्य ठिकाणी बैठक घेण्याची परंपरा पाहायला मिळते. त्यामुळेच बैठकीच्या छायाचित्रांमध्ये नेहमीच सुंदर ठिकाणांचे हमखास दर्शन होते. या ठिकाणांमध्ये बदलिंग सेक्टर, चेंगदेमधील राजांचे महाल, सान्याची किनारपट्टी इत्यादी ठिकाणांचा त्यात समावेश आहे. चीनच्या सरकारी राष्ट्रीय आण्विक महामंडळाचे उपाध्यक्ष निलंबित झाले आहेत.