आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तासांत उभे राहिले दुमजली घर, 9 तीव्रतेच्या भूकंपातही राहिल सुरक्षित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थ्रीडी प्रिंटिंगद्वारे तयार करण्यात आलेले घर. - Divya Marathi
थ्रीडी प्रिंटिंगद्वारे तयार करण्यात आलेले घर.
बीजिंग - होम कन्स्ट्रक्शनचा वेग वाढवण्यासाठी चीन रोज नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यात आता एका चिनी कंपनीने थ्रीडी प्रिटिंगच्या मदतीने दोनमजली घर उभे केल्याचा दावा केला आहे. झुओडा ग्रुपचे उपाध्यक्ष तान बुयोंग याच्या मते तो तीन तासापेक्षाही कमी वेळेत हे घर तयार करून त्यात इंटेरिअर डेकोरेशन, प्लम्बिंग, वायरिंग आणि इतर सुविधांनी ते सजवता येऊ शकते.
कचऱ्यापासून तयार होते मटेरियल
कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हे घर तयार करण्यासाठी वापरले जाणे मटेरियल हे शेती आणि फॅक्टरीतून निघणाऱ्या कचऱ्यापासून तयार केले जाते. ही घरे फायरप्रूफ आणि वॉटरप्रूफ असतात. तसेच 9.0 तीव्रतेपर्यंत भूकंपाचे धक्के ही घरे सहन करू शकतात.

क्रेनच्या मदतीने जोडतात मॉड्यूल
कंपनीने 17 जुलैला उत्तर-पश्चिम चीनच्या शांक्शी प्रांतात एक दुमजली घराच्या लिव्हिंग रूम, बेडरूम, किचन, रेस्टरूम याचे मॉड्यूल अवघ्या तीन तासांत क्रेनच्या मदतीने जोडले. हे मॉड्यूल थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीद्वारे फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आले होते. या टेक्नोलॉजीद्वारे घरे डिझाइन करणाऱ्या कंपनीच्या एका इंजिनीअरच्या मते, साधारणपणे पारंपरिक पद्धतीने दोनमजली घर उभे करायला सहा महिने लागतात. तर थ्रीडी प्रिंटींगच्या मदतीने 10 दिवसांत मॉड्यूल तयार होते. ते तीन तासांपेक्षाही कमी वेळात असेंबल केले जाते.

कमी खर्चात स्वस्त घरे
या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने एका चौरस मीटरसाठी केवळ 400-480 डॉलर म्हणजे सुमारे 25 से 30 हजार रुपये खर्च येतो. इसमें ट्रान्सपोर्टेशन, लेबर, मटेरिअल, मशिनरी आणि असेंबलींगचे कॉस्टींग घटल्यामुळे ही घरे अधिक स्वस्त बनतात. तर बिजिंग सारख्या शहरात नेहमीच्या पद्धतीने घर तयार करण्यासाठी 6113 डॉलर (389645 लाख रुपये) एवढा खर्च येतो.

3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
या तंत्रज्ञानात थ्री डायमेंशनल डिजिटल मॉडेलच्या मदतीने फिजिकल ऑब्जेक्ट तयार केले जाते. त्यात मटेरियलच्या अनेक थिन लेअर्स (पातळ थर) एकावर एक लावल्या जातात. संपूर्ण ऑब्जेक्ट तयार होईपर्यंत ही प्रक्रिया केली जाते. त्याची सुरुवात व्हर्च्युअल डिझाइन तयार करण्यापासून होते. थ्रीडी स्कॅनर किंवा थ्रीडी मॉडेलिंग प्रोग्रामच्या मदतीने CAD (कॉम्प्यूटर अॅडेड डिझाइन) मध्ये हवे तसे डिजाइन तयार करता येते. त्यानंतर थ्रीडी स्कॅनर ऑब्जेक्टची थ्रीडी डिजिटल कॉपी तयार केली जाते. त्यानंतर डिजिटल फाइल प्रिंटिंगसाठी तयार होते. थ्रीडी मॉडलिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने हजारो आडव्या लेअर तयार केल्यानंतर थ्रीडी प्रिंटिंगद्वारे लेयर टू लेयर फायनल ऑब्जेक्ट तयार होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, थ्रीडी प्रिंटिंगद्वारे तयार केलेल्या घराचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...