आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: चीनची विमानवाहू युध्‍दनौका लाँच; भारताला म्‍हटले होते, विकासावर लक्ष केंद्रीत करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुर्णत: स्‍वदेशी बनावटीची चीनची ही पहिलीच विमानवाहू नौका आहे. - Divya Marathi
पुर्णत: स्‍वदेशी बनावटीची चीनची ही पहिलीच विमानवाहू नौका आहे.
नवी दिल्‍ली/ बिजींग- चीनने स्‍वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युध्‍दनौका बुधवारी लाँच केली. या नौकेचे वजन 70 हजार टन असून तिची निर्मिती चीनमधील डालियान येथे उत्‍तर-पूर्व बंदरावर करण्‍यात आली आहे. संपूर्ण स्‍वदेशी बनावटीची चीनची ही पहिलीच युध्‍दनौका असल्‍याचे चीनच्‍या सरकारी मीडियातर्फे सांगण्‍यात आले आहे. विशेष म्‍हणजे चीनने दोन दिवसांपूर्वीच भारताला उपदेश केला होता की, भारताने विमानवाहू नौका बांधण्‍यापेक्षा आपल्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करावे.  
 
नोव्‍हेंबर 2013 पासून सुरु आहे नौकेची निर्मिती
- नौकेचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी 2020 पर्यंत या नौकेला  कुठेही तैनात करण्‍यात येणार नाही, असे चीनच्‍या सरकारी माध्‍यमांतर्फे सांगण्‍यात आले आहे.
- नोव्‍हेंबर 2013 मध्‍ये चीनने नौकेच्‍या निर्मितीचे काम सुरु केले होते, अशी माहिती चिनी माध्‍यमांनी दिली आहे.
- चीनने 23 एप्रिलरोजी आपल्‍या नौसेना स्‍थापनेचे 68वे वर्ष साजरे केले. तसेच सध्‍या उत्‍तर कोरिया आणि दक्षिण चीन समुद्रामध्‍ये चीनच्‍या वाढत्‍या हस्‍तक्षेपामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्‍ये पूर्णत: स्‍वदेशी बनावटीची विमाननौका लाँच करणे अतिशय महत्‍त्‍वाचे असल्‍याचे चिनी माध्‍यमांनी म्‍हटले आहे.
 
2 दिवसांपूर्वी भारताला म्‍हटले होते, आर्थिक विकासावर लक्ष केंद्रीत करा
- चीनचे सरकारी वृत्‍तपत्र ग्‍लोबल टाईम्‍सच्‍या माध्‍यमातून 24 एप्रिल रोजी चीनने भारताला उपदेश दिला होता की, 'हिंदी महासागरात चीनच्या प्रभावास चाप लावण्याकरता विमानवाहू नौका बांधण्यापेक्षा भारताने आपल्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करावे.'   
- 'भारत सध्या औद्योगिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे. अशा वेळी भारताला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विमानवाहू नौका बांधताना भारताला अनेक अडथळे येऊ शकतात. याचा भारताच्‍या विकासावर परिणाम होऊ शकतो. विमानवाहू नौका बांधणीसंदर्भातील नकारात्‍मक उदाहरण म्‍हणून भारताकडे पाहण्‍यास हरकत नाही.' अशी उपहासात्‍क टीका चीनने भारतावर केली होती.
- 'मागील काही दशकांमध्‍ये भारत आणि चीनने विमानवाहू नौकेच्‍या बांधणीसंदर्भात वेगवेगळे मार्ग अवलंबिले आहेत. मात्र दोन्‍ही देशांच्‍या हाती जे परिणाम आले आहेत त्‍यातून आर्थिक विकासाचे महत्‍त्‍व अधिक  असल्‍याचे अधोरेखित झाले आहे. त्‍यामुळे हिंदी महासागरातील चीनच्‍या वाढत्‍या प्रभावाला प्रत्‍युत्‍तर म्‍हणून दिल्‍लीनेही विमानवाहु नौकांच्‍या निर्मितीचा वेग वाढवण्‍याएवजी आपल्‍या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.', असा सल्‍ला चीनने भारताला दिला होता.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, विमानवाहू नौकेचा लाँचिंगदरम्‍यानचा व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  
 
बातम्या आणखी आहेत...