आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदी मोदींचा धाडसी निर्णय, चीनमध्ये याची कल्पनाही करता येणार नाही -ग्लोबल टाईम्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनच्या ऑफिशियल मीडियाने नोटबंदीच्या निर्णयाला धाडसी पाऊल म्हटले आहे. ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये लिहिले आहे की, मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय एक मोठे आणि धाडसी पाऊल आहे. हा इतिहास घडवेल. काही दिवसांपूर्वीच चीनी माध्यमांनी भारतातील नोटाबंदीची खिल्ली उडवली होती. तसेच महागात पडणारे राजकीय पाऊल असे म्हटले होते.
कल्पनाही करवत नाही की, १०० युआन बंद पडल्यावर काय होईल...
- ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे, की भारतात नोटाबंदीचा निर्णय अयशस्वी ठरो अथवा यशस्वी, मात्र हा निर्णय इतिहास नक्कीच रचेल.
- हा एक धाडसी आणि जोखमीचा निर्णय आहे. या निर्णयामुळे होणाऱ्या भ्रष्टाचारावरील परिणामांकडे चीनसुध्दा नजर ठेवून असेल आणि त्यातून नक्कीच शिकेल.
- आम्ही कल्पनासुध्दा करू शकत नाही की, चीनमध्ये जर 50 आणि 100 युआनच्या नोटा बंद केल्या तर काय होईल.
- हा निर्णय गुपीत ठेवण्यापासून त्याला लागू करण्यापर्यंत सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
सिध्दांताच्या विरोधात होती प्रक्रिया
- ग्लोबल टाइम्सच्या मते "मोदी अडचणीत होते, कारण हा निर्णय काळ्या पैशांविरोधात होता, मात्र याची प्रक्रिया सरकारच्या विरोधात होती."
- "धोरणात कोणत्याही सुधारणा अथवा बदल करण्याआगोदर जनतेचा पाठिंबा मिळवणे आवश्यक होते."
- "नोटाबंदीचा निर्णय भ्रष्टाचाराला नष्ट करेल, याचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. मात्र या अडचणींना जन्मायला घालणारे सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांना कशाप्रकारे सोडवतील."
- संपादकीयमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे की, जोपर्यंत भ्रष्टाचाराची पाळेमुळे जीवंत राहतील तोपर्यंत ही अडचण भेडसावत राहिल.
जनतेच्या सहनशक्तीची परीक्षा
- ग्लोबल टाइम्समध्ये लिहिले आहे "मोदी सरकारला वाटते होते की, एकदम भ्रष्टाचार नष्ट व्हावा. फारपूर्वीच जो निर्णय घ्यायचा होता, तो आता लागू करावा. "
- "नोटबंदी मोदींसाठी एखाद्या खेळातील डावाप्रमाणे आहे. या निर्णयाला लागू करण्याची सरकारची क्षमता आणि जनतेची सहनशक्ती दोघांचीही परिक्षा आहे.
- "मोदींना अपेक्षा आहे की, या निर्णयाचा निकाल नकारात्मक सामाजिक प्रभावाला नष्ट करेल तसेच त्यांचे मनोबल वाढवेल"
- ग्लोबल टाइम्सनुसार "सुधारणा करताना नेहमीच अडचणी येत असतात आणि ते करण्यासाठी धाडसासोबतच इतर गोष्टींचीही आवश्यकता असते."
- "नोटबंदी एक चांगले सकारात्मक पाऊल आहे, मात्र सरकारच्या लागू करण्याची पध्दत आणि जनतेच्या सहकार्यावर हे सर्व अवलंबून आहे."
बातम्या आणखी आहेत...