आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमावाद : अरुणाचल प्रदेशजवळ तिबेटमध्ये चीनने खुला केला नवा एक्स्प्रेस वे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनने तिबेटची राजधानी ते ल्हासा ते न्याइंगला जोडणारा ४०९ किलोमीटरचा मार्ग रविवारी वाहतुकीसाठी खुला केला. ३७ हजार ८६२ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला हा एक्स्प्रेस वे अरुणाचल प्रदेशापासून लागून असलेल्या तिबेटच्या सीमेच्या अगदी जवळ आहे.  
हा मार्ग टोलमुक्त असेल. तिबेटच्या दोन शहरांना जोडण्याबरोबरच पर्यटकांसाठीदेखील आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या मार्गावरून ताशी ८० किलोमीटर वेगाने वाहने धावू शकणार आहेत. ल्हासा व न्याइंंगचे सामान्य अंतर आठ तासांचे आहे. परंतु आता ते पाच तासांवर येणार आहे. त्यामुळे चीनच्या सैन्यालादेखील भारताच्या सीमेजवळून वाहतूक करणे सोपे होणार आहे.
 
तूर्त ल्हासा एक्स्प्रेस मार्गावरून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी आहे. दुसरीकडे भारत-चीन सीमेचा वाद आहे. ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ३ हजार ४८८ किलोमीटर लांब आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेट असल्याचा दावा चीनने वारंवार केला आहे. भारताने अक्साई चीन प्रदेशचा मुद्दा मांडला आहे. वास्तविक अक्साई प्रदेशावर चीनने अतिक्रमण केले आहे. १९६२ च्या युद्धानंतर चीनने बेकायदा प्रदेश बळकावण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यावरून भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतले आहे. त्यानंतरही चीनने कांगावा करण्याचे अनेकदा प्रयत्न केले होते.  भारतासोबतच्या सीमा वादानंतरही पाकसोबतची मैत्री वाढवताना चीनने  इंटरनेट सेवा देण्याचाही निर्णय घेतला. त्यासाठी विविध प्रकारची केंद्रे तयार केली जातील. सध्या पाकची दूरसंचार प्रणाली भारतीय कंपन्यांशी कोणत्या ना कोणत्या रूपात जोडलेल्या आहेत. 
 
हाँगकाँग अस्वस्थ
 चीन सरकारच्या हस्तक्षेपाला कंटाळलेल्या हाँगकाँगमधील जनता रविवारी हजाराेंच्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. लोकशाहीवादी विद्यार्थी नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ  केली. 
 
चीनच्या मदतीने दूरसंचार सेवेत परिवर्तनाचे पाकचे प्रयत्न  
पाकिस्तानच्या दूरसंचार क्षेत्रात लवकरच काही बदल दिसून येऊ शकतात. चीनच्या मदतीने पाकिस्तान तसे बदल करू पाहत आहे. आर्थिक प्रकल्पाच्या माध्यमातून पाकिस्तानने प्रयत्न सुरू केले आहेत. ही प्रणाली भारत व अमेरिकेहून वेगळी असेल. चीन व पाकिस्तान दोन्ही देशांना जोडण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबलचा वापर करणार आहेत. त्यामुळे इस्लामाबाद व बीजिंगमधील घनिष्ठता वाढत चालली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...