Home | International | China | Chinas new policy

तिबेटी गुराख्यांनी आपली वस्ती सीमेजवळ करावी; शी जिनपिंग यांची नवीन रणनीती

वृत्तसंस्था | Update - Oct 30, 2017, 03:00 AM IST

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तिबेटच्या गुराख्यांना भारत-चीन सीमेजवळ आपली वस्ती करावी आणि चिनी क्षेत्राची सुरक्ष

  • Chinas new policy
    बीजिंग- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तिबेटच्या गुराख्यांना भारत-चीन सीमेजवळ आपली वस्ती करावी आणि चिनी क्षेत्राची सुरक्षा करावी, असे आवतण दिले आहे. प्रदेशात शांततेशिवाय लाखो कुटुंबे शांततेत जगू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

    तिबेट आपल्या गुराख्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सीमेजवळ वस्ती करण्यासाठी प्रेरणा देईल आणि चीनचा संरक्षक बनेल, अशी अपेक्षा जिनपिंग यांनी व्यक्त केली. तिबेटच्या लुंझे येथील एका कुटुंबातील दोन मुलींनी जिनपिंग यांना पत्र पाठवले होते. त्याच्या उत्तरात जिनपिंग यांनी ही भूमिका मांडली. चीनच्या नैऋत्येकडील तिबेटमधील लुंझे भारताच्या अरुणाचल प्रदेशाजवळचे गाव आहे. अरुणाचलच्या सीमेवरील डोकलाममध्ये ऑगस्टमध्ये भारत आणि चीनचे सैन्य ७३ दिवस आमने-सामने होते. त्यादरम्यान चीनने तिबेटमध्ये ताेफा पाठवून युद्धाचा सराव केला होता.

    तिबेटच्या स्वातंत्र्याची मोहीम भारताने चालवावी : स्वदेशी जागरण मंच
    नवी दिल्ली । तिबेटला चीनमधून स्वतंत्र करण्यासाठी जगभरात मोहीम चालवली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचाने केले आहे. चीनच्या आर्थिक व्यवहारांना रोखण्यात यावे, अशी मागणीही मंचाने केली आहे. नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी आयोजित स्वदेशी सभेत जाहीरनाम्याद्वारे ही मागणी करण्यात आली. मंचाचे नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठसूत्री मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. घोषणापत्रात नागपूर मेट्रो व चेन्नई-म्हैसूर रेल्वेमार्गाच्या विकासासह अनेक योजनांची कंत्राटे चिनी कंपन्यांना द्यावी असे समाजाला वाटत नाही. त्यामुळे कंत्राट रद्द करावे, असे त्यात म्हटले आहे. चिनीउत्पादनांवर बहिष्कार टाकावा, असे म्हणणाराही देशात एक वर्ग आहे.

Trending