आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Army Aircraft Lands In Disputed South China Sea Islands

चीनने उतरवले या वादग्रस्त आयलंडवर मिलिटरी प्लेन, या देशांमध्ये वाढेल तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त आयलंडवर चीनने पहिल्यांदा आपले मिलिटरी एअरक्राफ्ट उतरवून नव्या वादाला तोंड फोडले आहे. आयलंडवर चीन आपला फायटर जेट बेस बनण्‍याच्या विचारात असल्याचे चीनी मीडियाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्‍ट्रीय देशांमधील अंतर्गत तणाव आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, दक्षिण चीन समुदातील या आर्टिफीशियल आयलंड बनवण्याला यापूर्वी अमेरिकेने विरोध दर्शविला होता. अमेरिकेने टेहाळणी करण्‍यासाठी अनेकदा आपली वॉरशिप येथे तैनात केले होते. यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झला होता.

आजारी कामगारांसाठी उतरवले विमान...
- चीनने गेल्या वर्षी या आयलंडवर रनवे तयार केला होता. 3,000 मीटर त्याची लांबी आहे. जानेवारीत पहिल्यांदा या ठिकाणी सिव्हिलियन फ्लाइटची चाचणी देखील घेण्यात आली होती.
- पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अधिकृत वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर या लॅंडिंगविषयी वृत्त प्रकाशित केले होते.
- रविवारी दक्षिण चीन समुद्रात पेट्रोलिंग करत असलेले चीनचे एक मिलिटरी एअरक्राफ्टला 'फेयरी क्रॉस रीफ'वर उतरवण्यात आल्याचा इमरजन्सी कॉल प्राप्त झाला. तीन आजारी कामगारांसाठी विमान उतरवण्याची माहिती मिळाली आहे.
- मिलिटरी एअरक्राफ्टमधून कामगारांना उपचारासाठी हेनान आयलंडवर हलवण्यात आले होते. आयलंडवर उभ्या उसलेल्या एअरक्राफ्टचे फोटो देखील प्रसिद्ध झाले होते.
- चीन युद्धाच्या प्रसंग या आयलंडवर आपले फायटर जेटचा बेस बनवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- आयलंडवरील एअरफील्ड प्रचंड मोठे आहे. यावर लॉन्ग रेंज बॉम्बर जेट, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टशिवाय चीनचे आधुनिक जेट देखील लँड व टेकऑफ करू शकतील.
- दक्षिण चीन समुद्रीमार्गे प्रति वर्ष 5 ट्रिलियन डॉलरचा इंटरनॅशनल ट्रेडिंग केले जाते. चीनशिवाय या आयलंडवर व्हियतनाम, मलेशिया, ब्रुनेई, फिलिपाइन्स व तैवानने दावा केला आहे.

काय आहे हा वाद?
- दक्षिण व पूर्वी चीन समुद्रातील बहुतांश भागावर चीनने आपला हक्क सांगितला आहे. दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देशांनी या भागातील स्प्रेटली आयलंड, पॅरासेल आयलंड व स्कारबोरोफ रीफवर आपला हक्क सांगितला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, दक्षिण चीन समुद्रात बनलेल्या आर्टिफिशियल आयलंडचे फोटो...