आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोकलाम पेचावर लवकरच तोडगा निघेल, सीमांचे रक्षण करण्यास भारत सज्ज - राजनाथ सिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डोकलाम पेचावर भारत-चीन चर्चेतून लवकरच तोडगा निघेल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास सक्षम देश असल्याचे राजनाथ म्हणाले. भारत चीन सीमा सुरक्षा दलाच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली.
 
चीनकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचा विश्वास असल्याचे ते म्हणाले. चीन ताठर भूमिका सोडून मधला मार्ग काढण्यास तयार होईल अशी खात्री अाहे. भारताने दुसऱ्या देशांच्या भूभागावर कधीही दावा केला नव्हता याची साक्ष जगही देईल, असे या वेळी बोलताना राजनाथ म्हणाले. भारत विस्तारवादी राष्ट्र असल्याचा शेजारी देशांचा आरोप बिनबुडाचा आहे हे वास्तव जगाला माहीत आहे. आपल्या सीमांचे रक्षण करण्यास भारत सज्ज असल्याचे ते या वेळी बोलताना म्हणाले.
 
सिक्कीम सेक्टरमधील पेच अद्यापही कायम आहे. सीमेला लागून  चीन रस्ता बांधू शकणार नाही या भूमिकेवर भारत ठाम आहे. दरम्यान, डोकलामवर आपला अधिकार असल्याचे भूतानने म्हटले आहे. चीनच्या अधिकृत माध्यमांनी भारताच्या डोकलाम येथील कारवाईचा वारंवार निषेध केला आहे. येथून भारताने बिनशर्त फौजा हटवाव्यात, असा सूर चिनी माध्यमांचा आजही आहे.
 
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या (आयटीबीपी) शौर्याचे कौतुक या वेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी केले. त्यांच्या निग्रहामुळेच भारताच्या सीमा सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. ३,४८८ किलोमीटरची सीमा आयटीबीपीमुळे सुरक्षित आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या तत्त्वांवर विद्यमान सरकार शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रराष्ट्र बदलू शकतात, मात्र शेजारी राष्ट्र बदलता येणार नाहीत याची जाणीव ठेवूनच मोदी सरकार संबंध दृढ करण्यावर भर देत असल्याचे राजनाथ म्हणाले.

गृहमंत्र्यांच्या हस्ते रँक बहाल
आयटीबीपीच्या १,६५४ अधिकाऱ्यांच्या बढतीची घोषणाही या वेळी करण्यात आली. सिंह यांच्या हस्ते नव्या रँक अधिकाऱ्यांना बहाल करण्यात आल्या. या वेळी गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांचीही उपस्थिती होती. या बढत्या गेल्या ६ वर्षांपासून प्रलंबित होत्या, असे या वेळी बोलताना रिजिजू म्हणाले. अधिकारी आणि जवानांच्या सुविधांकडे भविष्यात दुर्लक्ष होणार नाही याची हमी किरण रिजिजू यांनी दिली. बढतीला विलंब झाला तरीही लढण्याचे धैर्य खच्ची झाले नाही याचा अभिमान वाटतो, असे रिजिजू म्हणाले.

पुढील स्‍लाइडवर... पानगाँग लेकप्रकरणी भारतीय सैन्य जबाबदार; चीनचा आरोप
 
हेही वाचा... 
बातम्या आणखी आहेत...