आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जहाजातून काढले 300 टन मृत शार्क मासे, शॉकिंग आहेत PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
300 टन शार्क माशांनी भरलेले सील केलेले जहाज - Divya Marathi
300 टन शार्क माशांनी भरलेले सील केलेले जहाज
क्विटो- इक्वाडोरमध्ये चीनचे एक जहाज मृत अवस्थेतील 300 टन शार्क माशांसह पकडले आहे. त्यानंतर ही जहाज जप्त केले आहे. जहाजातील सर्व क्रू मेंबर्सला कोर्टाने कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चीनचा झेंडा असलेले एक जहाज रविवारी 300 टन मृत शार्क माशांसह गालापगोस आर्किपेलागो आयलंडजवळ पकडले होते. यात आरक्षित केलेल्या हेमरहेड शार्क माशांचा समावेश आहे. होऊ शकते तीन वर्षे शिक्षा.....
 
- चीनमधील फू युआन यू लेंग 999 नावाची एक भली मोठी बोट मरीन रिजर्वच्या आत आर्किपेलागोत आढळली, जे अनेक छोट्या आयलंड्सचा ग्रुप आहे.  
- बोटीवर 20 क्रू मेंबर्स आढळले. जर ते प्रोटेक्टेड स्पिशीजच्या तस्करीखाली दोषी ठरले तर त्यांना तीन वर्षाची जेलची शिक्षा होऊ शकते.
- इक्वाडोरमधील पर्यावरण मंत्री तारसिकियो ग्रानिजो यांनी सांगितले की, सॅन क्रिस्टोबाल आयलंडच्या कोर्टाने कोर्टाची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्वांना कस्टडीत ठेवण्यास सांगितले आहे. 
- मंत्र्याने सांगितले की, ''हे सर्व शार्क मासे मरीन रिजर्वमधून पकडले नसतीलही पण बोटीत आढळलेले लहान शार्क आणि बेबी शार्क हेच स्पष्ट करतात की, हे सर्व मासे रिजर्व क्षेत्रातून पकडले आहेत. 
- गालापगोस आर्किपेलागो आयलंडला यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले आहे कारण ही जागा जैव-विविधतेसाठी ओळखली जाते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सीज केलेल्या बोटीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...