आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियात चमकला हा चीनी कामगार, जबरदस्त बॉडीमुळे बनला \'हिरो\'!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विट उचलण्याचे काम करणारा शी शेनवेई आपल्या फिटनेस रूटीन आणि जबरदस्त बॉडीमुळे सोशल मीडियात स्टार बनला आहे. - Divya Marathi
विट उचलण्याचे काम करणारा शी शेनवेई आपल्या फिटनेस रूटीन आणि जबरदस्त बॉडीमुळे सोशल मीडियात स्टार बनला आहे.
हुबेई- अनेकदा ऑर्डिनरी लोक सुद्धा असे काही करून जातात ज्याचा विचारही केला जाऊ शकत नाही. चीनच्या या बांधकाम मजूराची कहानीही काहीशी तशीच आहे. विटा उचलण्याचे काम करणारा शी शेनवेई आपल्या फिटनेस रूटीन आणि जबरदस्त बॉडीमुळे सोशल मीडियात चमकत आहे. हा मजूर दिवसभरात 4000 विटा उचलतो. तो लंचच्या वेळी बॉडी बनविण्यासाठी वर्कआऊट करतो. इंटरनेटने बदलले जीवन.....
- हुबेई प्रांतात राहणरा शी जेव्हा माध्यमिक शाळेत शिकायचा, तेव्हाच त्याला इंटरनेटचे जग माहित झाले.
- शीने सांगितले की, पहिल्यांदा त्याला थोडे काम केले तर दमून, थकून जायचो आणि त्यानंतर त्याला काम करणे अवघड जायचे.
- यापासून बोध घेत त्याने स्वत:ला बदलण्याचा विचार केला व त्याने इंटरनेटवरील वर्कआउटचे व्हिडिओ पाहू लागला व त्यानुसार व्यायाम करू लागला.
- याचा परिणाम असा झाला की त्याची बॉडी एकदम उठून दिसू लागली. त्याचे रूटीनही खूपच बदलून गेले.
- त्याने आपल्या वर्कआउटचे फोटोज आणि व्हिडिओ शेयर केले जे खूपच वायरल झाले आहेत.
- सोशल मीडियात त्याचे 11 लाख फॅन्स झाले आहेत. तो ग्रामीण चीनमध्ये सर्वात लोकप्रिय झाला आहे.
- शी म्हणतो, '' याच इंटरनेटने माझे जीवन बदलले आणि मला सोशल मीडियात सेलिब्रिटी बनवले.''
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शी शेनवेईचे शानदार फोटोज...
बातम्या आणखी आहेत...