आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक इंचही जमीन गमावल्याचे दु:ख सहन करू शकणार नाही; चिनी माध्यमांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनने भारतावर घुसखोरी केल्याचा आरोप लावला आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
चीनने भारतावर घुसखोरी केल्याचा आरोप लावला आहे. (संग्रहित फोटो)
बीजिंग/नवी दिल्ली- चीन आपली एक इंचही जमीन कमी झाल्याचे सहन करणार नाही, असा इशारा चीनच्या सरकारी माध्यमांनी दिला आहे. सिक्कीममधील वादग्रस्त भागातून सैन्य माघारी घेणार नसल्याचेही चीनने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने भारत आणि चीनने शक्तीप्रदर्शन करण्याऐवजी थेट चर्चा करुन आपला प्रश्न सोडवावा असा सल्ला दिला आहे.
 
सिक्कीममध्ये डोकलाम भागात भारत आणि चीनचे सैन्य मागील 36 दिवसांपासून एकमेकांसमोर ठाकले आहे. हा एक त्रिकोणी भाग असून चीन तेथे रस्ता तयार करण्याची योजना आखत आहे. भारत आणि भूतानने याला विरोध केला आहे.
 
ही तर चीनच्या लोकांची इच्छा
- चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र द ग्लोबल टाइम्सने शुक्रवारी आपल्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की,  चीन आपल्या जमिनीचा एक इंच हिस्सा गमावणेही पसंत करणार नाही. ही चीनच्या नागरिकांचीच इच्छा आहे. आम्ही आमच्या नागरिकांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करु शकत नाही.
 
सुषमा स्वराज यांच्यावर खोटं बोलल्याचा आरोप
- द ग्लोबल टाइम्सने सुषमा स्वराज यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. भारतीय संसदेत त्या खोटं बोलत होत्या असे म्हटले आहे.
- सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की, भारताने चीनच्या भागात घुसखोरी केलेली नाही आणि सर्व देश भारताचे समर्थन करतात. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
भारताची ताकद चीनपेक्षा कमी
- भारताने चीनमध्ये घुसखोरी केली असून भारताची ताकद चीनपेक्षा कमी असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
- भारत-चीनमधील संबंध बिघडल्यास व त्याच्यात युध्द झाल्यास भारत पराभूत होईल असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. 
 
सुषमा स्वराज काय म्हणाल्या होत्या
- राज्यसभेत सुषमा स्वराज यांनी दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेतल्यास भारत-चीनबरोबर चर्चेस तयार असल्याचे म्हटले होते. त्यांनी दोन्ही देशातील विवाद शांततेच्या मार्गाने मिटावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. 
 
चीन सैन्य माघारी घेणार नाही
- चीन आपले सैन्य माघारी घेणार नाही, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. भारताने तणाव वाढल्यास सर्व बाबींसाठी तयार राहावे असेही देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
 
अमेरिकेचा सल्ला
- भारत आणि चीनने शक्तीप्रदर्शन करण्याऐवजी थेट चर्चा करुन आपला प्रश्न सोडवावा असे अमेरिकेने म्हटले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...