युलिन - चीनच्या गुआंग्झी प्रांतातील युलिन शहरात प्रत्येक वर्षी जून महिन्यात कुत्र्यांच्या मांसाचा महोत्सव (डॉग मीट फेस्टिव्हल) साजरा केला जातो. मात्र यंदा महोत्सव सुरु होण्यापूर्वीच वन्यजीव हक्क कार्यकर्त्यांनी विरोध सुरु केला आहे. युलिनमध्ये प्रत्येक दिवशी 300 कुत्रे आणि मांजरी कापले जातात,असा दावा त्यांनी केला आहे. यात बहुतेक पाळीव असतात. वन्यजीव हक्क टीमने केले खुलासे..
- ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलच्या संघाने नुकतेच युलिनचा दौरा केला. येथून त्यांनी अनेक पुरावे जमा केले आहे.
- डॉ. पीटर ली यांनी सांगितले, की कत्तलखान्यांमध्ये प्रत्येक दिवशी 300 कुत्रे-मांजरींची मारली जातात.
- त्यांना गरम पाण्यात शिजवून कातडे काढले जातात. हा खूप त्रासदायक मृत्यू असतो.
- यंदा जूनमध्ये होणा-या डॉग मीट फेस्टिव्हलमध्ये 10 हजार कुत्रे-मांजरींचा बळी दिली जाण्याची अंदाज वर्तवला जात आहे.
- लीने सांगितले, कत्तलखान्यात कत्तल करण्यात आलेल्या कुत्रे- मांजरींच्या गळ्यात पट्टे दिसत होते. याचा अर्थ यातील बहुतेक पाळीव होते.
- कुत्रे-मांजरींचे कत्तल पाहिल्याने इतर जनावरांच्या वर्तनात बदल झाला असल्याचे डॉ. ली यांनी सांगितले.
- कुत्र्याचे मांस शहरातील सर्व रेस्तरॉंमध्ये सहज मिळते, असे ली यांच्या टीमला आढळले आहे.
- आकडेवारीनुसार, चीनमध्ये प्रत्येक वर्षी 10 ते 20 लाख कुत्र्यांची कत्तल केली जाते.
स्थानिक प्रशासन लक्ष देत नाही
- चीन, दक्षिण कोरिया आणि काही इतर देशांमध्ये कुत्र्यांचे मांस खाण्याची परंपरा 500 वर्ष जूनी परंपरा आहे.
- मात्र डॉग मीट फेस्टिव्हल काही वर्षांपूर्वीच सुरु झाले आहे. स्थानिक प्रशासन यात हस्तक्षेप करीत नाही.
- गेल्या वर्षी प्रशासनाने सोशल मीडिया सांगितले होते, की काही लोक कुत्र्याच्या मांसाचा आस्वाद घेण्यासाठी महोत्सवात येतात. मात्र स्थानिक प्रशासन कधीही अशा महोत्सवांचे आयोजन करीत नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा कत्तल करण्यापूर्वी कुत्रे-मांजरींचा केला जातो छळ...