बीजिंग - चीनच्या यँग्टजी नदीत सोमवारी उशिरा रात्री एका प्रवासी जहाज बुडाले. या जहाजावर 458 प्रवासी होते. त्यात सर्वाधिक वृद्ध चीनी पर्यटक असल्याची माहिती समोर येत आहे. वादळाच्या तडाख्यात जहाज सापडल्याने ते बुडाले. वादळानंतर अवघ्या 2 मिनीटांत जहाज बुडाले. चीन प्रशासनाने 20 लोकांना वाचवले असल्याचे सांगितले आहे. अजूनही बचाव कार्य सुरु आहे. गेल्या काही वर्षातील चीन मधील ही मोठी दर्घटना असल्याचे सांगितले जात आहे.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी जास्तीत जास्त प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, वादळी वातावरणामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. पंतप्रधान ली घटनास्थळी दाखल झाले आहेत. चीनच्या पीपल्स डेली या वृत्तपत्रातील वृत्तानुसार सात प्रवासी पोहत किनाऱ्यावर आले आणि त्यांनी घटनेची माहिती दिली. हुबई डेली या वृत्तपत्रानुसार नदीमध्ये जहाजाचे अवशेष दिसल्यानंतर बचाव कार्य सुरु झाले.