Home | International | China | Chinese Kindergarten Under Investigation For Needle Torture And Stripping Toddlers

KG च्या मुलांना सुयांनी करायचे टॉर्चर, कपडे काढून अत्याचार; सर्वत्र संताप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 24, 2017, 02:46 PM IST

शाळेबाहेर जमलेल्यांपैकी काहींच्या मुलांच्या शरीरावर सुया टोचल्याच्या खुणा सापडल्या आहेत.

 • Chinese Kindergarten Under Investigation For Needle Torture And Stripping Toddlers

  बीजिंग - चीनच्या राजधानीतील एका प्रतिष्ठित शाळेबाहेर शेकडो पालकांनी गर्दी केली आहे. ते सगळेच शाळेच्या केजी शिक्षकांच्या अटकेची मागणी करत आहेत. शाळेबाहेर जमलेल्यांपैकी काहींच्या मुलांच्या शरीरावर सुया टोचल्याच्या खुणा सापडल्या आहेत. किंडरगार्टनच्या या निष्पाप मुलांना नियंत्रित करण्यासाठी हे शिक्ष सुया टोचून त्यांना टॉर्चर करत होते. यानंतर घटनास्थळी पोलिसांना बोलावले असून त्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

  चीन सरकारने घेतली गंभीर दखल
  > चीनच्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांपैकी एक RYB च्या किंडरगार्टनमध्ये शिकणाऱ्या एका मुलाच्या पालकांनी आपल्या चिमुकल्याच्या शरीरावर सुई टोचल्याच्या खुणा पाहिल्या. ह्या खुणा चिमुकल्यांच्या शरीरावर जागोजागी होत्या. त्यांनी पोलिस स्टेशन गाठले तेव्हा अशा प्रकारची तक्रार करणारे आपण एकटे नाहीत असे त्यांच्या लक्षात आले.
  > बीजिंग पोलिसांना RYB शिक्षण समूहाच्या केजीच्या वाढत्या तक्रारी पाहता केजीच्या इमारतीवर धाड टाकली. यात पोलिसांनी शाळेतून विविध प्रकारच्या औषधी आणि इंजेक्शन सापडले आहेत. त्यात सर्वाधिक औषधी झोपेच्या होत्या.
  > शाळेतील सीसीटीव्हीतून सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये या केजीतील शिक्षक चिमुकल्यांना जेवताच झोपेचे इंजेक्शन द्यायचे. जेणेकरून शिक्षकांनाही आराम करता येईल. अनेक मुलांच्या शरीरात गुंगीचे औषध सापडले आहे.
  > केजीतल्या मुलांना भिती दाखवण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे शिक्षक त्यांना वर्गात कपडे काढून उभे करण्याची शिक्षा देखील देत होते. या प्रकरणी 3 शिक्षकांना सस्पेंड करण्यात आले असून शाळा प्रशासनाविरोधात चौकशी सुरू आहे. या घटनेची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असल्याचे पाहता चीन सरकारने देखील गंभीर दखल घेतली आहे.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, शाळा आणि पालकांचे आणखी काही फोटोज...

Trending