आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Man Murders Ex Wife Lover In High Speed Car Crash

CCTV फुटेज - चीनमध्‍ये एकाने पत्‍नी आणि बॉयफ्रेंडला कारने चिरडले, युवक ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तियानचांग- चीनमध्‍ये एकाने पोलिस स्‍टेशनसमोरच त्‍याची पूर्वीची पत्‍नी आणि तिच्‍या बॉयफ्रेंडला कारची धडक दिली. ते दोघेही गंभीर जखमी झाले नि काही वेळाने बॉयफ्रेंडचा मृत्‍यू झाला. ही घटना CCTV फुटेजमधून पुढे आली आहे. सायना न्यूज वेबसाइटच्‍या माहितीनुसार, ही घटना अनहुई प्रांतातील तियानचांग शहरातील आहे. यामध्‍ये ठार झालेल्‍या युवकाचे नाव मिन आहे, तर जखमी मुलीचे नाव किन सांगण्‍यात येत आहे.
या व्‍हिडियोमध्‍ये स्पष्‍ट दिसत आहे की, किन आणि मिन पोलिस स्टेशनसमोर टॅक्‍सीमधून उतरत होते. तेवढ्यातच एक काळ्या रंगाच्‍या कारने त्‍यांना जोरदार धडक दिली. एवढेच नव्‍हे तर दोघांनाची चिरडून कार निघून गेली. या घटनेतून किन वाचली, पण बॉयफ्रेंड मिन ठार झाला आहे. पोलिसांनी कारचालक झांगला ताब्‍यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..