आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहनतीची कमाई : चार टन नाणी घेऊन निघाला कार घ्यायला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेंगयांग - निवडणुकीत विराेधकांवर मात करण्यासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी हजारो रुपयांची नाणी घेऊन गेलेला "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' चित्रपटाचा नायक आपल्या सर्वांनाच माहीत आहे; परंतु वास्तविकतेत असे काही घडल्यास आश्चर्य वाटतेच. काहीसे असेच घडले चीनमधील एका कारच्या शोरूममध्ये. एका व्यक्तीने कारच्या बदल्यात दिलेली रक्कम पाहून शोरूमचे कर्मचारी दंग राहिले. त्याने कारसाठी चार टन वजनाची नाणी दिली होती आणि तीही एक हजाराच्या ३२० बंडलांत गुंडाळून. गेन नामक व्यक्ती चीनमध्ये एका पेट्रोल पंपावर काम करायचा. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याने काबाडकष्ट केले अन् आयुष्यभराची कमाई जमवून ठेवली. या कमाईचा एकही रुपया निरर्थक खर्च होऊ नये म्हणून तो बसने प्रवास करता पायीच कामावर जायचा. असे करत त्याने सुमारे ७० लाख रुपये जमवले आणि शेवटी त्यातून कार विकत घेतली. कार विकत घेण्यासाठी त्याने ७० हजार पाउंड (सुमारे ६८ लाख ४५ हजार रुपये) रकमेची नाणी आणि दोन हजार पाउंड (सुमारे एक लाख ९५ हजार रुपये) नोटांच्या रूपात दिले. ही रक्कम मोजता मोजता शोरूमच्या कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले होते. यापूर्वीही असे प्रकरण घडले आहे. काही दिवसांपूर्वी हेनान प्रांतातील झेंगझाऊच्या ली कियोंग बीएमडब्ल्यूचे ७३० मॉडेल विकत घेण्यासाठी एका लाख नोटांच्या गड्डी घेऊन डीलरकडे गेल्या होत्या. या नोटांचे मूल्य सुमारे १० लाख रुपये होते आणि नोटांच्या गड्डींचे वजन १०० किलो इतके होते. फूड रिटेल बिझनेस करणाऱ्या ली यांनी अन्य रक्कम बँक कार्डच्या माध्यमातून दिली होती. दक्षिण चीनमधील मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, नोटा मोजण्यासाठी शोरूममधील २० कर्मचाऱ्यांना तब्बल सहा तास लागले होते.

नाणी मोजण्यासाठी सहा तास
गेनयांनी दिलेली नाणी हजार ३२० बंडलांत गुंडाळून ठेवली होती आणि त्यांचे वजन चार टन होते. या नाणी ट्रकमधून काढण्यासाठी दहा कर्मचाऱ्यांना पाचारण करावे लागले. इतकेच नव्हे तर नाणी मोजण्यासाठी तब्बल सहा तास लागले.