आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-तिबेट सीमेजवळ धडकले चीनचे अत्याधुनिक रणगाडे, वाद सुरू असतानाच शक्तीप्रदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - सिक्किममध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये वाद चिघळला असतानाच गुरुवारी चीनने तिबेट आणि भारताच्या सीमेजवळ रणगाडे उतरवले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक टँकचे वजन 35 टन असून त्यांचा सराव घेतला जात आहे. विशेष म्हणजे, चीनने आपल्या बुलडोझरने मंगळवारी भारताचे दोन बंकर उद्ध्वस्त केले. तसेच बुधवारी सुद्धा एक बंकर नेस्तनाबूत केला. एवढेच नव्हे, तर भारतीय भाविकांच्या कैलास मानसरोवर यात्रेत सुद्धा अडवणूक केली आहे. 
 
 
असे आहे चीनचे शिंकिंगटन टँक
- भारतात वापरात असलेल्या रशियन बनावटीच्या टी-90 एस टँकपेक्षा शक्तीशाली असल्याचा दावा चीन करत आहे. 
- चीनच्या शिंकिंगटनमध्ये 105 एमएम टँक गन आणि 35 एमएम ग्रेनेड लाँचर सुद्धा आहे. यासोबतच टँकमध्ये 12.7 एमएम क्षमतेची मशीनगन सुद्धा लावण्यात आली आहे. 
- उंच डोंगराळ भागांवर हल्ले करण्यासाठी या रणगाड्यांचे गन खास पद्धतीने वर ठेवण्यात आले आहे. 
- इतर रणगाड्यांच्या तुलनेत हलके परंतु शक्तीशाली असलेल्या शिंकिंगटनचे वजन 35 ते 38 टन इतके आहे. 
- यामध्ये 1000 हॉर्सपावरचे 8V150 इंजिन लावण्यात आले आहे. 
 
 
LAC वर भारताचे 100 रणगाडे
गेल्या वर्षीच भारताने 100 टी-72 रणगाड्यांचा ताफा जम्मू आणि काश्मिरच्या लदाख येथील लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर (LAC) तैनात केले आहेत. ही सीमा भारत आणि चीनला वेगळे करते. सुत्रांच्या माहितीनुसार, भारत या भागात 6 सशस्त्र पथक तैनात करण्याच्या तयारीत आहे. यात 300 हून अधिक रणगाडे तैनात केले जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...