Home | International | China | Chinese Naval Hospital Ship Peace Ark In Mozambique

पाण्यावर तरंगणारे सर्वात मोठे रुग्णालय, पाहा आतील PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 13, 2017, 05:09 PM IST

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीने (पीएलएएन) जगातील सर्वात मोठे जहाजावरील रुग्णालय आफ्रिकेतील मोझांबिक देशात पाठवले.

 • Chinese Naval Hospital Ship Peace Ark In Mozambique
  मापुटो (मोझांबिक) - चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीने (पीएलएएन) जगातील सर्वात मोठे जहाजावरील रुग्णालय आफ्रिकेतील मोझांबिक देशात पाठवले आहे. चिनी लष्कर येथे 8 दिवस राहून स्थानिक नागरिक शाळकरी मुलांची आरोग्य तपासणी, उपचार शस्त्रक्रिया करतील. याशिवाय डॉक्टरांचे पथक मोझांबिक लष्कराच्या रुग्णालयातही जाईल. पीस आर्क शिप नोव्हेंबर रोजी राजधानी मापुटात पोहोचेल. यामध्ये मेडिकल स्टाफ आहे. चिनी लष्कराने पीस आर्क शिप सद्भावना मोहीम-2017 अंतर्गत मोझांबिकला पाठवले आहे. जहाज आफ्रिका आशियांतील बहुतांश गरीब देशांत जाऊन आले आहे.
  > पीस आर्क जहाजाची लांबी 178 मीटर आहे. रुंदी 24 मीटर तर वजन 14 हजार टन आहे. जहाजाचे क्षेत्रफळ हजार चौ. फूट आहे. चालक दल सदस्यांत 381 जण आहेत.
  > जहाजात 500 खाटांचे रुग्णालय आहे. यामध्ये 35 आयसीयू, 12 ऑपरेशन थिएटर आहेत. एकाच वेळी 60 मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात.
  > जहाजात 155 तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. रुग्णालय जीनिव्हा परिषदेच्या अटीनुसार चालते. जहाजावरील रुग्णालयाने याआधी अंगोलामध्ये हजार व्यक्तींवर उपचार केले आहेत.
  > चिनी नौदलाने ही मोहीम 2008 मध्ये सुरू केली होती. आतापर्यंत 36 देशांमध्ये हे जहाज जाऊन आले आहे. वैद्यकीय कर्मचारी शाळांमध्ये मुलांचे हात धुणे, स्वच्छता, चिनी संस्कृती कुंग-फूबाबतही माहिती देतात.
  पुढील स्लाइड्सवर पाहा, रुग्णालयाचे Inside PHOTOS

Trending