आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Park Ranger Captures Incredibly Rare Salamander

PICS : चीनमध्ये डायनासोरपेक्षाही प्राचीन प्राणी सापडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये एका प्राचीन प्राण्याचे अस्तित्व सापडले आहे. सॅलामेंडर म्हणून ओळखला जाणारा हा प्राणी डायनासोरपेक्षा जुन्या काळात पृथ्वीवर अस्तित्वात असल्याचे संशोधकांचे मत आहे. सुमारे १७ कोटी वर्षांपासून हा प्राणी पृथ्वीवर आहे. या काळात उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानवापासून सूक्ष्म जिवाणूतही खूप मोठे बदल झाले मात्र, हा प्राणी आहे तसाच आहे.

दक्षिण चीनमध्ये एका उद्यानाची देखभाल करणार्‍या व्यक्तीस हा प्राणी आढळून आला. उत्पत्तीपासून आहे त्याच स्वरूपात हा प्राणी आधुनिक काळात सापडल्याने त्याला जिवंत जीवाश्म म्हणूनही संबोधले जात आहे. पृथ्वीवर प्रत्येक जिवंत किंवा निर्जीव वस्तूंमध्ये काळानुरूप बदल होत गेले. मात्र, सॅलामेंडर बदललेला नाही. प्रचंड उष्णतामानातही तग धरून राहणार्‍या प्राण्यास सॅलामेंडर म्हणतात.

चिनी कायद्यानुसार हा प्राणी नामशेष होत चाललेल्या प्रजातींच्या यादीत आहे. या प्राण्याची शिकार करणे हा चीनमध्ये गुन्हा ठरतो. त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

उभयचर
सॅलामेंडर हा उभयचर प्राणी आहे. डायनासोर्सचा ज्युरासिक काळ या पृथ्वीतलावर सर्वात प्राचीन काळ मानला जातो. किंबहुना आजवर उत्क्रांतीपूर्वीपासूनचा सर्वात प्राचीन प्राणी म्हणून डायनासोर्सची ओळख होती. मात्र, आता या नव्या प्राण्याने जगभरातील अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नदीमध्ये दिसल्याने धक्का
जियोनामक एका रेंजरला जेव्हा हा प्राणी नदीमध्ये दिसला तेव्हा आश्चर्याचा धक्का बसल्याचे चीनमध्ये एका वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या प्राण्यास पुन्हा जंगलात सोडून देण्यात आल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

असा समजही
हा प्राणी ज्या ठिकाणी आढळतो त्या भागांत प्रचंड संपत्ती किंवा गुप्त खजिना आढळतो, असा चीनमध्ये समज आहे. त्यामुळे या अद्भुत प्राण्याबद्दल चीनमध्ये प्रचंड आकर्षण आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा या प्राण्याचे काही खास फोटो...